विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपणार; लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान
Laxman Hake : 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपलेलं दिसणार असल्याचं मोठं विधानस ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलंय. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापल्याची परिस्थिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून कडाडून विरोध दर्शवला जात आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीवरुन लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलायं.
कोलकात्यातील अत्याचार प्रकरणावर बोलण्यासाठी तोंडं उघडली नाही, अन् आता…; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल
लक्ष्मण हाके म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगेंना जाऊन भेटले आहेत. अशोक चव्हाण हे तीन चार वेळा तर शरद पवारही भेटले आहेत. एकनाथ शिंदे तर रेड कार्पेटच करतात. या मुख्यमंत्र्यांना राज्यात शोषित, पीडित, वंचित, समाजिक दृष्ट्या मागास असलेला ओबीसी समाज राहतो याचं सोयसुत्र नसावं का? ओबीसीच्या आरक्षणाबद्दल ते एक चकार शब्द बोलत नाही, त्यांना फक्त जरांगेंच्या मताची काळजी असल्याची टीका हाके यांनी केलीयं.
लोक विरोध करत नाहीत तोपर्यंत तपासच करणार नाही का? न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं
तसेच यांना राज्यातील बहुसंख्य असलेल्या ओबीसी मताची जराशीही फिकीर नाही. ओबीसी बांधवांना विनंती, बाबांनो हे सर्व आजी-माजी मुख्यमंत्री पक्ष सोडून एक आहेत. ओबीसींचं सामाजिक दृष्ट्या आरक्षण संपवणार आहेत. या निवडणुकीनंतर ओबीसींचं आरक्षण संपलेलं दिसेल. तुम्ही आम्ही फक्त हुजरे घालत बसा, ओबीसी बांधवानो याचं ऑडिट निवडणुकीत करावं लागेल यांना फक्त निवडणूका मत आपले आमदार कसे निवडून येतील एवढचं दिसतं हे लोकं ओबीसी आंदोलनावर काही बोलत नाही, अशीही टीका हाके यांनी केलीयं.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अंतरवाली सराटीत दाखल झाले.पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत माजी खासदार रजनीताई पाटीलही उपस्थित होत्या.पृथ्वीराज चव्हाण आणि जरांगे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.