फडणवीसांच्या बुद्धीची किव येते, त्यांनीच पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आरक्षण टिकवलं नाही; पटोलेंचा पलटवार
Nana Patole on Devendra Fadanvis for Maratha Reservation : पुणे शहरातील बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन पार पडलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis ) आरक्षणावरून विरोधकांना खडेबोल सुनावले. त्यावरून आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole). यांनी फडणवीसांच्या बुद्धीची किव येते, त्यांनीच पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आरक्षण टिकवलं नाही. असं म्हणत टीका केली आहे.
हॉकीपटू पीआर श्रीजेशची निवृत्तीची घोषणा! पॅरिस ऑलम्पिक 2024 ठरणार शेवटची स्पर्धा
काय म्हणाले नाना पटोले?
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काल पुण्यामध्ये भाजपने घोषणांचा पाऊस पडला. तसेच कार्यकर्त्यांना धमकीवजा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फडणवीस साहेबांच्या बुद्धिमत्तेचे किवा वाटते. त्यांनी आरक्षणावरून विरोधकांना घेतलं. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं आरक्षण तेच टिकवू शकले नाहीत. असंविधानिक सरकार त्यांनी बोलावलं सुप्रीम कोर्टाने हे असंविधानिक सरकार ठरवलं आहे. त्यामुळे त्यांचे 105 आमदार निवडून दिल्याने लोकांना चूक केल्यासारखं वाटत आहे. अशी टीका पाठवले यांनी केले.
शिवाजी काळगेंची खासदारकी जाणार? जात वैधता प्रमाणपत्राला हायकोर्टात आव्हान
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
काँग्रेसचं सरकार दीर्घकाळ सत्तेत होतं. शरद पवार मुख्यमंत्री होते मग का नाही आरक्षण नाही दिल? आम्ही सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. आधी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं. सर्वोच्च न्यायालयातही प्रभावीपणे बाजू मांडली. मात्र आघाडीचं सरकार आलं आणि या सरकारने मराठा समाजाचं आरक्षण घालवलं अशी टीका फडणवीस यांनी केला. माझा सवाल मनोज जरांगे पाटील यांना नाही. माझा सवाल शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची भूमिका काय आहे जाहीर करा असे फडणवीस म्हणाले.