क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ‘ओबीसी’तून आरक्षण कशाला; लक्ष्मण हाकेंचा मार्मिक टोला
मराठे क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवंय, असा थेट सवाल करीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना मार्मिक टोला लगावलायं.
 
          Laxman Hake On Manoj Jarange : मराठे क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवंय, असा थेट सवाल करीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मार्मिक टोला लगावलायं. दरम्यान, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलायं. त्यामुळे राज्यात मराठा-ओबीसी समाजात संघर्ष सुरु असल्याचं चित्र आहे. त्यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी टोला लगावलायं.
लाडकी बहीण योजनेचा 27 लाख लाभार्थी महिलांना बसणार धक्का, हप्ता जमा होण्यास होणार उशीर….
हाके म्हणाले, मनोज जरांगे यांची शांतता रॅली पार पडली. या रॅलीच्या सभांमधून ते मराठे क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी आहे, असं सांगून पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद का निर्माण करत आहेत. जातीची श्रेष्ठता सांगून जातींमध्ये भेदभाव निर्माण करीत आहेत, ते जातीने श्रेष्ठ असतील तर त्यांना ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवे आहे, असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी केलायं.
video: क्रूरतेचा कळस! पतीने पत्नीला बाईकला बांधत फरफटत नेलं; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी गजाआड
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी अनेकदा सरकारविरोधात आंदोलन केलं. मात्र, अद्यापही आरक्षणावर तोडगा निघाला नाही. त्यामुळं ते सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह ओबीसी नेते छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, पैसे परत घेणार नाही; राणांच्या विधानावर अजितदादांकडून सारवासारव
नूकताच सांगलीमध्ये OBC मेळावा पार पडला. या मेळाव्यातून लक्ष्मण हाके यांनी सडेतोडपणे भाष्य करुन मनोज जरांगे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मनोज जरांगे जशी भाषा करतील त्याचं पद्धतीने त्यांना उत्तर देणार असल्याचा इशाराही हाके यांनी या मेळाव्यातून दिला. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केलीयं.


 
                            





 
		


 
                         
                        