video: क्रूरतेचा कळस! पतीने पत्नीला बाईकला बांधत फरफटत नेलं; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी गजाआड

पतीने आपल्या पत्नीला टूव्हीलरला बांधून फरफटत नेल्याची ही घटना आहे. राजस्थानमधील ही घटना आहे. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

video: क्रूरतेचा कळस! पतीने पत्नीला बाईकला बांधत फरफटत नेलं; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी गजाआड

Viral Video : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यामध्ये अत्यंत क्रूर अशी धक्कादायक घटना घडली आहे. (Viral Video) पतीने आपल्या पत्नीला टूव्हीलरला बांधून फरफटत नेल्याची ही घटना आहे. पत्नी यावेळी मदतीसाठी ओरडत होती, पण तिच्या पतीला थोडीदेखील दया आली नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

घुलेंचा आमदारकीचा चंग.. प्रतापराव, मोनिकाताई टेन्शनमध्ये

पतीने आपल्या पत्नीसोबत अत्यंत निर्दयपणा दाखवला आहे. पत्नीला गावभर फरफटत नेल्यानंतर तो काही वेळाने गाडी थांबवतो. त्यानंतर पत्नीच्या अंगावर जाऊन उभा राहतो. पत्नी वेदनेने किंचाळत असते. ओरडत असते. पण, पतीवर काहीही परिणाम होत नाही. तो या घटनेनंतरही आपण काहीतरी चांगल काम केल्याच्या अविर्भावात दिसत आहे. दरम्यान, आरोपी पती प्रेमाराम मेघवाल याला अटक झाली आहे.

follow us