लाडकी बहीण योजनेचा 27 लाख लाभार्थी महिलांना बसणार धक्का, हप्ता जमा होण्यास होणार उशीर….

लाडकी बहीण योजनेचा 27 लाख लाभार्थी महिलांना बसणार धक्का, हप्ता जमा होण्यास होणार उशीर….

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana ) योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 35 महिला पात्र ठरल्या असून 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तत्पुर्वी महिलांच्या बॅंक खात्या (bank account) संदर्भात सरकारन महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. या आदेशाचे पालन न केल्यास महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी शासनाने सांगितलेल्या अपडेटवर त्वरित दुरूस्ती करून घेणं आवश्यक आहेत.

Byju ला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने BCCI सोबत सेटलमेंट ऑर्डरला दिली स्थगिती 

लाडकी बहीण योजनेंतर्गत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डेबिटद्वारे पैसे जमा केले जातील. पात्र लाभार्थ्यांपैकी 27 लाख महिला लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्यांशी लिंक केलेले नाही. या महिलांची बँक खाती आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

Emergency Trailer: ‘गूंगी गुड़िया अब बोलने लगी है’, कंगनाच्या ‘इमर्जन्सी’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित 

यावेळी त्यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात यावी. तसेच येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्यांशी आधार कार्ड लिंक करण्यात यावे, असे आदेश दिलेत.

बँकेशी आधार लिंक करा – तटकरे
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय आणि बॅंक खाती आधार कार्डशी लिंक केली आहेत, त्यांना 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचे हफ्त जमा होणार आहेत. ज्या महिलांची बँक खाती आधार कार्डशी लिंक केलेली नाहीत, त्यांच्या खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यानंतर पैसे जमा होतील. त्यामुळे लाभार्थी महिलांनी बँकेशी आधार लिंक करावे. लाभापासून वंचित राहू नका, असे आवाहनही तटकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत नसून अर्ज भरण्याची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं तटकरेंनी यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube