Chhagan Bhujbal On 400 Par : देशभरात सुरू असलेला लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम लवकरच शांत होईल. अंतिम टप्प्यातील मतदान आता दोन दिवसांवर आलंय. ही लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये झाली. त्यातील आता शेवटचा टप्पा. दरम्यान, ही निवडणूक सुरू झाल्यापासून भाजपचा नारा आहे “अब की बार 400 पार” त्या घोषणेवर आता भाजपसोबत असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलय. ते म्हणाले ‘अब की बार ४०० पार’ या घोषणेमुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. तसंच, या घोषणेमुळे एनडीएचं नुकसान झालं असा थेट दावाच त्यांनी केला.
Uddhav Thackeray On PM Modi : मोदींच्या एनडीएत येण्याच्या ऑफरवर उद्धव ठाकरे म्हणाले, डोळा मारलाय पण
भाजपाच्या या घोषणेमुळे भाजपासह मित्रपक्षांसमोर निवडणुकीच्या प्रचारात मोठं आव्हान निर्माण झालं होतं असं वकव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. भुजबळ म्हणाले, ”मला एक गोष्ट सांगायची आहे की निवडणुकीच्या आधीपासूनच भाजपावाल्यांनी 400 पार बोलून बोलून देशातील दलित समाजाच्या मनात ही गोष्ट एवढी बिंबवली की आता भाजपाने 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर देशाचं संविधान बदललं जाणार असा विचार लोक करायला लागले होते. ही गोष्ट त्यांच्या मनातून बाहेर काढता काढता आमच्या नाकी नऊ आले असंही भुजबळ म्हणाले.
तसंच, पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका वृत्तवाहिनीवर १५ ते २० मिनिटे याच विषयावर बोलत होते, असं होणार नाही, देशाचं संविधान बदललं जाणार नाही, ही गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. तसंच नरेंद्र मोदी सांगत होते की, आम्ही संविधानाचे रक्षक आहोत. यावर्षी आपल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे आम्ही हे वर्ष साजरं करणार आहोत अस बरच काही. परंतु, संविधान बदलणार ही गोष्ट लोकांच्या मनात इतकी खोलवर गेली होती की त्याचा परिणाम आपल्याला मागच्या निवडणुकीत लक्षात आला असेल असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.
Loksabha Election : 400 पार सोडाच भाजप 250 च्या आतच! योगेंद्र यादवांचा मोठा दावा
केंद्रात सत्तास्थापनासाठी 272 हा बहुमताचा आकडा आहे. ज्या पक्षाला हा आकडा गाठता येतो त्यांना आपली सत्ता स्थापन करता येते. किंवा कमी असताना या आकड्याची जुळवाजुळव केली तरीही सत्ता स्थापन होते. परंतु, भाजपने आपण 400 जागा जिंकणार असा दावा सुरूवातीपासूनच केला आहे. भाजपच्या या दाव्यावर विरोधक संशय व्यक्त करत होते आणि आजही करत आहेत.
भाजपाला देशाचं संविधान बदलायचं आहे, भाजपाने 400 जागा जिंकल्या तर यंदाची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक असेल, भाजपाला 400 जागा मिळाल्यास ते देशात हुकूमशाही सुरू करतील, आणीबाणी लादतील, असं अनेक आरोप आणि दावे विरोधकांनी केले आहेत.परिणामी भाजपाच्या हेतूंवर शंका उपस्थित होऊ लागली. अखेर या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक मुलाखती आणि प्रचारसभांमधून उत्तर द्यावं लागलं.