केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणणार? E20 मुळे इंजिन अन् मायलेजच्या तक्रारी वाढल्याने निर्णय घेणार

Central Government reintroduce E10 petrol देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांन E10 पेट्रोलची शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे.

Central Government Reintroduce E10 Petrol

Central Government Reintroduce E10 Petrol

Central Government reintroduce E10 petrol decision after complaints regarding engines and mileage using E10 petrol : देशामध्ये गाड्यांसाठी वीस टक्के इथेनॉल मिश्रित असलेलं पेट्रोल वापरल्यानंतर अनेकांच्या गाड्यांचं मायलेज कमी झाल्याचे त्याचबरोबर इंजिन खराब झाल्याचे प्रकरणं समोर आले आहेत. यावरून सर्वसामान्य ग्राहकांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. मात्र या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता सरकार पुन्हा एकदा दहा टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E10 पुन्हा आणण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी देखील E20 पेट्रोल ऐवजी E10 पेट्रोलचा पर्याय देण्याची शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे.

सिस्पे घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल काळोखेला न्यायालयीन कोठडी; आर्थिक गुन्हे शाखेकडून चार गु्न्ह्यांचा तपास सुरू

दरम्यान केंद्र सरकारने E20 पेट्रोल आणल्यानंतर मुख्य समस्या आल्या त्या भारतातील कोट्यावधी जुन्या कार आणि बाईक्सला कारण भारतात E20 ला कम्पॅटॅबल गाड्या या 2024 किंवा त्या दरम्यान आलेल्या आहेत. मात्र त्यांचे प्रमाण जुन्या गाड्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे या वाहनांना E20 नाही तर E10 पेट्रोल चालू शकतात. त्यामुळे या गाड्यांना नुकसान होत आहे.

एकनाथ शिंदेंकडून शिवसेना जाणार?, 39 प्रतिज्ञापत्रांमध्ये 2018 ची पक्षघटना कशी आली? सिब्बलांचा मुळावर घाव

त्यामुळे आता जर पुन्हा E10 पेट्रोल बाजारात आलं तर जुन्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वाहन धारकांना त्यांच्या गाडीच्या इंजिनच्या क्षमतेनुसार E10 किंवा E20 निवडता येईल. ओवर रविवारी गाड्यांच्या इंजिनचा होणारे नुकसान कळेल त्याचबरोबर मायलेज वर होणारा परिणाम कमी होईल.

अभिनेता गोविंदासोबत वाद कसा मिटला?, घटस्फोटाचा अर्ज मागं का घेतला?, पत्नी सुनीता अहुजा यांची भूमिका काय?

मात्र दुसरीकडे E10 आणि E20 हे दोन्ही पेट्रोल बाजारात एकाच वेळी उपलब्ध करून देणं हे सरकार आणि तेल कंपन्यांसमोर मोठ्या आव्हान निर्माण करणार असेल. पेट्रोल पंपांवर या दोन्ही प्रकारच्या इंधनासाठी वेगळे स्टोरेज टँक वाहतूक व्यवस्था आणि डिस्पेन्सिंग पंपांची सोय करावी लागणार आहे.

Exit mobile version