अभिनेता गोविंदासोबत वाद कसा मिटला?, घटस्फोटाचा अर्ज मागं का घेतला?, पत्नी सुनीता अहुजा यांची भूमिका काय?
अभिनेता गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका अधिकृतपणे मागे घेतल्याचं सांगितलं.
अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा (Entertainment) यांच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. सुनीता अहुजा यांनी गोविंदाविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका कायदेशीररित्या मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
दरम्यान, बुधवारी सकाळी सुनीता अहुजा या त्यांचा मुलगा यशवर्धन याच्यासोबत मुंबईतील फॅमिली कोर्टात पोहोचल्या. त्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात पुन्हा काही वाद निर्माण झाला का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचे समोर आल्यानंतर या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. दोघांमध्ये आता पुन्हा सलोखा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक नात्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. दोघांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे बोलले जात होते. त्यानंतर हे दाम्पत्य घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला. विशेष म्हणजे दोघांकडूनही काही मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले होते
या काळात गोविंदाने सुनीतावर अनेक रिॲलिटी शोमध्ये येण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केल्याचे वृत्त होतं. दुसरीकडं सुनीता यांनी गोविंदाच्या कथित रिॲलिटीशिपवरून नाराजी व्यक्त केली होती. गोविंदाशी जोडल्या गेलेल्या कोमल राणी यांच्यावरूनही सुनीता यांनी प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे दोघांच्या नात्यातील तणावाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली होती
गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका अधिकृतपणे मागे घेतल्याचं सांगितलं. त्यांच्यामते, सुनीता यांनी यापूर्वी याचिका दाखल केली होती, मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ही याचिका मागे घेतली आहे. या निर्णयामुळे दोघांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना काही प्रमाणात विराम मिळाला आहे
रिपोर्ट्सनुसार, सुनीता अहुजा यांनी 5 December 2024 रोजी वांद्रे फॅमिली कोर्टात गोविंदाविरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. विश्वासघात, क्रूरता आणि वेगळे राहणे या कारणांचा त्यात उल्लेख असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता ही याचिका मागे घेण्यात आल्याने गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोघांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे आणि शांततेचे दिवस यावेत, अशीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे