Drought Inspect : दुष्काळी परिस्थितीची केंद्राकडून पाहणी; शुक्रवारी पथक अहिल्यानगर जिल्ह्यात

Drought Inspect  : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची केंद्र शासनाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, दुष्काळाची प्रत्यक्ष

Drought Inspect

Drought Inspect

Drought Inspect  : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची केंद्र शासनाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. पथकाकडून जिल्ह्यातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतीवरील परिणाम तसेच आवश्यक उपाययोजनांची पाहणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची वस्तुस्थिती केंद्र शासनाच्या पथकाला प्रत्यक्ष पाहता यावी, यासाठी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पथकाकडून विविध ठिकाणी भेटी देऊन स्थानिक परिस्थितीची पाहणी तसेच संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली जाणार आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन, टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध जलस्रोतांची स्थिती आदी बाबींचीही पाहणी होणार आहे. त्याचबरोबर पावसाअभावी शेतीपिकांवर झालेला परिणाम, पीक नुकसानीचे पंचनामे, चारा उपलब्धता आणि पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबतची वस्तुस्थितीही पथकाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे.

बुऱ्हानगर येथील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ.अक्षय कर्डिले यांची पाहणी, खड्डे बुजवा, कचरा हटवा

केंद्र शासनाचे पथक जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल केंद्र शासनाला सादर करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, त्याची तीव्रता आणि आवश्यक मदतीबाबतची वस्तुनिष्ठ माहिती केंद्र शासनापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

Exit mobile version