मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची काल (दि.29) शेवटची तारीख होती. त्यानंतर आता या अर्जांची आज (दि.30 ) छाननी केली जाणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मोठं विधान केले आहे. शिंदे गटान हेलिकॉप्टरने तीन एबी फॉर्म दिले, मी पाहिलंय असे भुजबळ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची कल्पना अजितदादांनी पवारांना (Ajit Pawar) दिली होती असेही म्हटले आहे. अजित पवार बोलले त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी शरद पवारांच्या कानावर टाकले होते, असं भुजबळ म्हणालेत. भुजबळांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. (Chagan Bhujbal On AJit Pawar Statement)
“शरद पवार प्रगल्भ नेते पण, त्यांनी माझी नक्कल करणं..”, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?
एबी फॉर्म का दिले यावर वरिष्ठ चर्चा करतील
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, इगतपुरीचा फॉर्म ते देऊ शकले नाहीत. एबी फॉर्म का दिले त्यावर वरिष्ठ चर्चा करतील असे भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दे असे समीर भुजबळ यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आणि अर्ज भरला असे छगन भुजबळांनी स्पष्ट केले.
अजित पवार काय म्हणाले होते?
तासगावमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मोठं भाष्य केलं. 70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली (Assembly Election 2024) होती. त्यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील होते. त्यांनी माझी खुली चौकशी करावी, असं म्हणत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार जावून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. परंतु त्या फाईलवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं गेलं. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी त्या फाईलवर सही केल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
फक्त दोन मिनिटांचा उशीर अन् संधी हुकली; माजी मंत्र्याची धडपड व्यर्थ, अर्ज राहिला हातातच…
देवेंद्र फडणवीस यांनी बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी, असे आदेश देत सही केल्याचं अजित पवार यांना दाखवलं. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवून सहकार्य केलं. त्या आर. आर. पाटलांनीच माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथील सभेत बोलताना केलाय. आर आर पाटील यांनी राजीनामा देऊन थेट अंजनी गाठलं. राजीनाम्याची मला कल्पना देखील दिली नव्हती, अशी खदखद अजित पवार यांनी भरसभेत बोलून दाखवली आहे. संजय काका पाटील यांना मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन अजित पवार यांनी त्यांच्या भाषणातून केलंय.