Video : माणूस जनावरासारखा मारला जात असेल तर…; भुजबळांनी फोटो दाखवताच भयाण शांतता

Chahagan Bhujabal यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात बोराडेंच्या हत्येचे काही दाखले देत फोटो दाखवले

Your Paragraph Text (24)

Your Paragraph Text (24)

Chahagan Bhujabal on Brutal murder Photograph in Maharashtra : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात सीआयडीच्या हाती देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे फोटो अत्यंत क्रूर दिसत आहेत. जे पाहिल्यावर काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. त्यावर सध्या राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

मोठी बातमी! अमरनाथ यात्रा 2025 साठी वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सर्वकाही…

त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात राज्यातील दलित समाजाच्या व्यक्तींच्या झालेल्या हत्यांचे काही दाखले देत फोटो दाखवले त्यावेळी सभागृहात भयान शांतता पसरली होती त्या फोटोमधून त्यांची पुरताच नाही तर जनावरांना देखील अशा पद्धतीने मारलं जाणार नाही हे स्पष्ट दिसत होतं.

खुशखबर! सोनप्रयाग ते केदारनाथ केवळ 36 मिनिटांत, मोदी मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, आपल्या राज्यात गेल्या काही महिन्यांतील काही घटनांनी हादरून सोडलं आहे. संतांच्या या महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी हा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू पावला. त्याची देखील चौकशी पोलीस करणार नाही. तर बीडच्या मासाजोगच्या प्रकरणांमध्ये शिक्षेची मागणी करणारे काही लोक सुर्यवंशीच्या आरोपींना माफ करण्याची भाषा करतात का? तो दलित आहे. म्हणून हा महाराष्ट्र माझा नाही का? दलित समाजातील लोकांवर झालेल्या अत्याचार यावर कारवाई होणार नाही का? असा सवाल यावेळी भुजबळ यांनी केला.

तसेच यावेळी बोराडे हत्या प्रकरणावर बोलताना भुजबळ यांनी थेट सभागृहात या व्यक्तीला मारतानाचे क्रूर फोटो दाखवले. ज्यामुळे सभागृहात भयान शांतता पसरली भुजबळ म्हणाले. तसेच भुजबळ मिळाले की हे सर्व प्रकरण दलित समाजातील व्यक्तींच्या असल्याने त्यांना न्याय मिळणार नाही का? की राज्यात केवळ उच्च जातीतील लोकांना मारल्यानंतर त्याचा निषेध होणार आहे या प्रकरणांचा निषेध कोण करणार असाल भुजबळ यांनी केला. त्यामुळे यावर पोलीस किंवा राजकीय लोकांना दोष न देता यावर एकत्र येत तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version