Chandrakant Khaire ठाकरे सरकार पाडण्यासाठी ‘समृद्धी’चा पैसा वापरला, अधिकाऱ्याचे कनेक्शनही केले उघड…

नांदेड : महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ‘समृद्धी’ महामार्गाचा पैसा वापरला आहे. या सर्वाचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते महामार्गचे प्रमुख राधेश्याम मोपलवार हेच करत होते, असा थेट आरोप संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना फोडणे आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी समृद्धी […]

Eknath Shinde Chandrakant Khaire

Eknath Shinde Chandrakant Khaire

नांदेड : महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ‘समृद्धी’ महामार्गाचा पैसा वापरला आहे. या सर्वाचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते महामार्गचे प्रमुख राधेश्याम मोपलवार हेच करत होते, असा थेट आरोप संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना फोडणे आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी समृद्धी महामार्गाचा पैशाचा वापर केला आहे. समृद्धी महामार्गात मोठा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराच्या पैशातून ठाकरे सरकार पाडण्यासाठी आणि शिवसेना फोडण्यासाठी वापरला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.

Dilip Sopal यांनी जागवल्या बापटांच्या आठवणी : स्पोर्ट शूज घालून झोपणारा मित्र गेला… – Letsupp

एमएसआरडीसीचे तत्कालीन प्रमुख राधेश्याम मोपलवर यांनी कटकारस्थान केले आहे. मोपलवर हा माणूस अत्यंत डॅबीस माणूस आहे. त्यानेच मोठा गैरव्यवहार केला आहे. सर्व गोष्टी मॅनेज करायचे काम हा मोपलवर करायचा, असा थेट आरोप देखील चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वापर फक्त राजकारणासाठी केला जात आहे. भाजपला सावरकर यांचे काहीही प्रेम नाही. आम्ही सावरकर यांना भारतरत्न द्या म्हणून मागणी केली आहे. आता तर भाजपचे केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. तरीही भाजप सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देत नाही. केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ते सावरकर यांच्या नावाचा उपयोग करून घेत आहे, असा आरोप देखील भाजपवर चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केला.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Exit mobile version