Download App

चंद्रकांत पाटलांना मनसेनं फटकारलं; दाखवला ‘तो’ व्हिडीओ

Raj Thackeray On Chandrakant Patil : बाबरी मस्जीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा (Shivsainik)सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता यामध्ये मनसेनं (MNS)फटकारलं आहे. मनसे अधिकृत ट्वीटरवरुन राज ठाकरेंचा (Raj Thackeray)एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्वीटमध्ये म्हटलंय की, अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी राज ठाकरें सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा, असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सावधान! तुम्ही पण गोमूत्र पिताय? अभ्यासातून झाला धक्कादायक खुलासा

या व्हिडीओमधून राज ठाकरे बाबरी मस्जीद (Babri Masjid)पाडली त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? हे सांगत आहेत. बाबरी मस्जीद पाडली त्यावेळी भाजपसह (BJP)कोणत्याच पक्षाने घेतली नाही. त्यावेळी त्याची जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray)घेतली होती. अशा शब्दांमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांना फटकारलं आहे.

त्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे म्हणत आहेत की, ज्यावेळी बाबरी मस्जीद पाडली होती त्यावेळी दुपारीच्यावेळी दीड-दोन तासांनी एका वृत्तपत्रातून फोन आला, त्यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना विचारलं की, इथं बाबरी मस्जीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत पण भाजपचे सुंदरलाल भंडारी यांनी सांगितले की, ही गोष्ट काही आमच्या भाजपच्या लोकांनी केलेली नाही, हे कदाचित शिवसैनिकांनी केली असेल. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, ते जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो. हे सर्व बोलणं सुरु असताना आपण त्याठिकाणी उपस्थित होतो, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. त्यावेळी मस्जीद पाडल्याची जबाबदारी अंगावर घेणं ही महत्वाची गोष्ट होती. असं म्हणत असलेला राज ठाकरेंचा व्हिडीओ मनसे अधिकृतच्या ट्वीटरवरुन शेअर करण्यात आला आहे.

त्यामुळे एक प्रकारे मनसेनं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यााला प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यावेळी जबाबदारी घेण्याची वेळ होती, त्यावेळी भाजपने ती घेतली नाही आणि आज भाजप नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. यावरुन मनसेनं फटकारलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्यावेळी बाबरी मस्जीद पाडली त्यावेळी आपण व्यवस्थापनासंदर्भातील कामासाठी अयोध्येत उपस्थित होतो, असंही त्यांनी सांगितलं आहे. बाबरी प्रकरणाविषयी बोलताना पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येत शिवसेना गेली होती का? बाळासाहेब ठाकरे अयोध्येत गेले होते का? असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

त्यावेळचा ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की, होय याची जबाबदारी मी घेतो, जबाबदारी घतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते का? शिवसेना तिथे गेली होती का? बजरंग दल तिथं होतं का? कारसेवक कोण होते? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. असंही यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us