Download App

मतांसाठी ठाकरे राहुल गांधींना शरण; बदललेल्या भाषणाच्या स्टाईलवरून भाजपनं संधी साधली

Chandrashekhar Bavankule : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा ( Bharat Jodo Yatra ) रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात नेहमी प्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो… अशी न करता त्यांनी काल भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, “जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो…” अशी हाक देत भाषणाला सुरुवात केली. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

आठवलेंना उमेदवारी द्या, अन्यथा विरोधात प्रचार करणार; आरपीआय पदाधिकारी आक्रमक

माध्यमांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे भाषणाची सुरूवात हिंदू बांधव असं म्हणत करायचे. त्यांनी ते भाषण काल बदललं. उद्धव ठाकरे मतांसाठी राहुल गांधींना शरण गेले आहेत. काल ५० टक्के खुर्च्या सोडून लोक निघून गेले. राहुल गांधी यांचे भाषण लोकांना कळलं नाही. राहुल गांधींचे भाषण म्हणजे हास्यजत्रा आहे. कालची सभा ही हास्यजत्रा होती. आम्हाला कोणाला संपवायची गरज नाही, जनता आमच्या सोबत आहे.

मला धमकावणाऱ्या अजितदादांना आता माझा आवाका समजेल; शिंदेंनी समजावूनही शिवतारे ठाम

त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर हसू येत आहे. कुठे नरेंद्र मोदी आणि कुठे तुम्ही. मोदींचा फोटो लावून तुमचे १८ खासदार निवडून आले, तुम्हाला १८ खासदार निवडून आणण्याचे चॅलेंज आहे. असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंना त्यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे.

Ashok Chavan on Rahul Gandhi | राहुल गांधींचे विधान माझ्या संदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे...

देशभरानंतर अखेर रविवारी काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Yatra) सांगता झाली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदान शिवतीर्थावर जाहीर सभेच्या माध्यमातून भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला आहे. या सभेला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते उपस्थित

follow us