आठवलेंना उमेदवारी द्या, अन्यथा विरोधात प्रचार करणार; आरपीआय पदाधिकारी आक्रमक

आठवलेंना उमेदवारी द्या, अन्यथा विरोधात प्रचार करणार; आरपीआय पदाधिकारी आक्रमक

अहमदनगर – नगर जिल्ह्यात नगर दक्षिणेचे लोकसभेचे (Nagar Dakshina Lok Sabha) उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र शिर्डी लोकसभेचा (Shirdi Lok Sabha) तिढा अद्यापही कायम आहे. शिर्डीमधून रिपाइंला उमदेवारी मिळावी, अशी मागणी मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Aathawale) केली आहे. त्यानंतर भाजपने आठवले यांनाच उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते भाजपचा प्रचार करणार नाही, तर उलट रिपब्लिकन पक्षाचा अपक्ष उमेदवार देऊ, अशा इशारा उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे (Ajay Salve) यांनी दिला.

मला धमकावणाऱ्या अजितदादांना आता माझा आवाका समजेल; शिंदेंनी समाजावूनही शिवतारे ठाम 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक झाल्यानंतर त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या वर्षभरापासून आरपीआयच्या वतीने मागणी केलेली आहे. निवडणुकीच्या काळातच आरपीआय पक्षाची आठवण येते, अन्यथा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आठवलेंचा विसर पडतोय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे आता भाजपने आठवले यांनाच उमेदवारी द्यावी. अन्यथा आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते भाजपाचा प्रचार करणार नाही, उलट रिपब्लिकन पक्षाचा अपक्ष उमेदवार देऊ, असं साळवे म्हणाले.

साळवे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आरपीआय पक्षाला सोलापूर व शिर्डी या दोन जागा मिळावी म्हणून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली होती. त्यापैकी शिर्डीची जागा आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्यासाठी मागितली होती. आठवले यांना मागच्या वेळेसारखे राज्यसभा खासदारकी व मंत्रीपद देऊन शांत करणार असाल तर ते आम्ही खपून घेणार नाही. आम्ही भाजपा बरोबर 2009 साला पासून काम करत आहोत. 2014 मध्ये त्यांचा आम्ही प्रचार केला, आमचे केंद्रात राज्यात भलेही आमदार खासदार नसतील, मात्र आमच्या पक्षाच्या जोरावरच त्यांना सत्ता स्थापन करता आली. त्यामुळे भाजपने त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रीपद दिले, असं साळवे म्हणाले.

यावेळी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे समवेत दक्षिण जिल्हाध्यक्ष सजंय भैलुमे, उत्तर महा. शशीकात पाटील, युवक अध्यक्ष अमित काळे, विलास साठेसर, सदाशिव भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, चंद्रकांत ठोबें, नाना पाटोळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजु जगताप, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र इबाळे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, जेष्ठ नेते गौतम घोडके, दया गजभिजे आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज