राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं भाजपविरोधी राजकारण असून त्यांना कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नसल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. बावनकुळे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी ते शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्व कशाला? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्या दौऱ्याला? पवारांनी फटकारले
बावनकुळे म्हणाले, उद्योजक गौतमी अदानींचा तपास सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या आधारे झाला पाहिजे. देशाच्या व्यवस्थेकडून ज्या काही चौकशा आहेत, त्या होऊ दिल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे.
PM Modi: भारतात वाघांच्या संख्येत वाढ; पीएम मोदींनी आकडेवारी केली जाहीर
तसेच पंतप्रधान मोदींना आज 78 टक्के पसंती मिळाली असून देश पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे विदेशी ताकद आपल्या भारताला उद्योजकांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
फडणवीस म्हणाले… हा तर शरद पवारसाहेबांचा अपमान
कुठे चुकलं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार चौकशी होऊ द्या, या प्रकरणी राष्ट्रवादीचे शरद पवारांचंही तेच म्हणणं असून त्यांचं राजकारण आमच्या विरोधी असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
Kirit Somayya : मढ मालाड येथील बेकायदा स्टुडिओला आदित्य ठाकरेंचा आशिर्वाद
दरम्यान, शरद पवार आमच्या विरोधात काम करीत असून त्यांना कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. गौतम अदानींची जेपीसी चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
मात्र, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर या प्रकरणाला वेगळं लागल्याचं दिसतंय. गौतमी अदानींची जेपीसी नाहीतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यावरुन काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचं दिसून आलं.