फडणवीस म्हणाले… हा तर शरद पवारसाहेबांचा अपमान

फडणवीस म्हणाले… हा तर शरद पवारसाहेबांचा अपमान

Fadnavis Speak On Sharad Pawar : सत्ताधारी आणि विरोधक हे नेहमीच एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असताना आपण पाहतो. मात्र नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बाजू घेत काँग्रेस नेत्याला शाब्दिक टोला लगावला आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी पवारांविषयी केलेल्या एक वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, पवार हे भारताच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्यावर अशा शब्दात टीका करणे म्हणजे हा त्यांचा अपमान असल्याचे फडणवीस म्हणाले.

वादाचे कारण?
सध्या उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावरून राजकारण पेटले आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अदानी विषयी बोलले होते. देशाच्या प्रगतीमधील अदानी याचे योगदान नाकारता येणार नाही. तसेच आपल्या उद्योजकांचे खच्चीकरण करू नये असे पवार म्हणाले होते. एकीकडे हे सगळं सुरु असले तरी मात्र दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी यांच्याविरोधात लढाई सुरु केली आहे. अदानी यांची संपत्ती तसेच घोटाळे यावरून राहुल गांधी केंद्रसह अदानी यांच्यावर निशाणा साधत आहे.

अलका लांबा काय म्हणाल्या?
कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासमवेतचा फोटो ट्विट करत काही नेते भ्रष्टांना पाठीशी घालत आहेत. राहुल गांधी एकटेच जनतेची लढाई लढत आहेत, असे ट्विट केले होते.

लांबा यांच्या ट्विटला फडणवीसांचे प्रत्युत्तर
राजकारण आपल्या जागी आहे आणि ते होत राहील; पण जे भारताच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आहेत, दीर्घकाळचे सहयोगी आहेत आणि ज्यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले आहे, त्यांच्याबद्दल अशी भाषा घातक आहे. राहुल गांधी भारताची प्रगल्भ राजकीय संस्कृती संपविण्याचे काम करीत आहेत. असे ट्विट फडणवीसांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube