Chandrashekhar Bawankule : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) अभूतपूर्व यश मिळाले. परंतु, महायुतीत सातत्याने मानापमान नाट्य पाहायला मिळंत. पालकमंत्री पदाचा वाद अद्याप संपलेला नाही. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाकित केलं. 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असं विधान त्यांनी केलंय.
कोट्यवधी लोकांना होणार फायदा, पीएफ खात्याच्या हस्तांतरण प्रक्रियेचे नियम बदलले; जाणून द्या सर्वकाही
एका सभेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकसित करण्याचा संकल्प केला आहे. देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आता आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते, असं बावनकुळे म्हणाले.
संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे आता…, CM फडणवीसांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर, मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरला रवाना झाले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही जम्मू काश्मीरला रवाना झाले होते. यामुळे महायुतीत श्रेयवाद सुरू झाल्याची टीका होतेय. यावरही बावनकुळेंनी भाष्य केलं. पर्यटकांना सुखरूप आणण्याच्या प्रयत्नाला कोणी श्रेयवाद म्हणत असेल तर दुर्दैवाची बाब आहे. यात राजकारण करणं योग्य नाही, असं ते म्हणाले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काश्मीरचा दौरा केला. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी पहलगामला गेले ही चांगली गोष्ट आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन यातून पुढं जायचं आहे. देश मजबूत करायचा आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांबाबत घेतलेला निर्णय देशासाठी महत्त्वाचा आहे. या देशाला एकसंध ठेवण्याकरता हा निर्णय महत्वाचा आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे राज्य सरकार काटेकोरपणे पालन करेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.