“खैरेंना लोकशाही कळालीच नाही. त्यांना युती शासनाची सत्ता आली ती पाहावलं जात नाही. त्यामुळे खैरेंवर न बोललेलं चांगलं. खैरे यांनी लोकशाही मान्य केली पाहिजे. कोणताही पालकमंत्री असो त्याचा संदेश ऐकला पाहिजे. युती शासनाचा पालकमंत्री झालेला खैरे यांना पचत नाही.” अशी टीका छत्रपती संभाजीनगरचे. (chatrapati sambhajinagar) पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केली आहे.
आज महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमानंतर भुमरे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीची वज्रमूठ विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
Sanjay Shirsat : वज्रमुठ सभेत अजित पवार फक्त शरीराने, त्यांच्या मनात काय ते 2-3 दिवसांत कळेल
यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, या जिल्ह्यांना (छत्रपती संभाजीनगर) मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये वज्रमूठ दाखवून दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एक मार्केट कमिटी आल्याचे दाखवून द्यावे. आज पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आहे ती सुद्धा महायुतीकडे येईल. महाविकास आघाडीचे वज्रमुठ विधानसभेपर्यंत टिकणार नाही. असा दावा त्यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील बाजार समित्यांमध्ये मी इंटरेस्ट घेतला नाही, म्हणून जागा जिंकलो नाही, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावर येत्या निवणुकीत इंटरेस्ट घेऊन दाखवा असं आव्हान भुमरे यांनी त्यांना दिल आहे.
कळमनुरी बाजार समितीत आमदार संतोष बांगर यांना धक्का, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांच्याविषयी बोललं जात आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले की, ते तुम्ही अजित दादांनाच विचारलं पाहिजे तुम्ही कुठे आहात. तुम्हाला वज्रमठ सभेत महत्त्व आहे की नाही. महाविकास आघाडीत धुसफुस दिसत आहे एक दिवस याचा स्फोट होणार आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, ठाकरे आणि महाविकास आघाडीला या ठिकाणच्या जनतेने बाजार समितीच्या निवडणुकीत नाकारले आहे. ठाकरे गटाचे सगळे इथे असताना देखील एकही बाजार समिती त्यांच्या हातात नाही.
मी भुजबळांना घाबरत नाही, त्यांनी माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहाव; कांदेंचं थेट आव्हान
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरचे घेण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार ही रास्त मागणी असून बैठक घेण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहे असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले.