कळमनुरी बाजार समितीत आमदार संतोष बांगर यांना धक्का, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

कळमनुरी बाजार समितीत आमदार संतोष बांगर यांना धक्का, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

kalmanuri Agricultural Produce Market Committee election result : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Kalmanuri Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला आहे. कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुध्द महाविकास आघाडी अशी लढत झाली. भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) आणि शिवसेनेला 5 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे.

कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, महाविकास आघाडीने कडवी झुंज देत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत मविआच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळं शिंदे गटाच्या पदरी निराशी पडली आहे. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाला त्यांच्या विरोधात गेला आहे. महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार बांगर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मी भुजबळांना घाबरत नाही, त्यांनी माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहाव; कांदेंचं थेट आव्हान

राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचा विजय होत आहे. धनशक्ती विरुध्द जनशक्तीचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ झालेली आहे. ह्या ताकदी पुढे कुणी ही पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचं रण असंच सुरु राहणार आहे. विरोधकांना प्रत्येक निवडणुकीत जनता धुळ चारेल. आताही विरोधकांचे 50 खोके ह्या जनतेने लाथाडले आहेत, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी दिली.

या पुढे ही यांची परिस्थिती आम्ही करणार आहे. मिंधे गट पैशाच्या बळावर मतदार विकत घेण्याचा प्रयत्न करत होता. प्रामाणिक मतदारांनी यांना याची जागा दाखवून दिलेली आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विनायक भिषे यांनी दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube