Download App

मुंडेंवर आरोप असताना राजीनामा…मीच पहिलं बोललो, भुजबळांचं दमानियांना प्रत्युत्तर

Chhagan Bhujbal Answer To Anjali Damania : राजकीय वर्तुळात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झडत आहेत. आज पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. धनंजय मुंडे कधी राजीनामा देतात, याची वाट भुजबळ बघत आहेत, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं. यावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) प्रतिक्रिया समोर आलीय.

“शिंदे नाराज नाहीत पण, त्यांना नक्की विचारणार”, मुनगंटीवारांच्या मनात नेमकं काय?

भुजबळ म्हणाले की, सोडा …अंजली दमानिया यांना काहीही बोलू द्या. उलट धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) आरोप होत असताना इतर कोणीही बोलत नव्हतं. त्यावेळी मीच पहिल्यांदा बोललो होतो, की धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणं योग्य होणार नाही. जोपर्यंत त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशी मागणी चुकीची आहे. इतर कोणी बोलायच्या आधी मी बोललो होतो. त्याचं उदाहरण पण मी दिलेलं आहे.

यावेळी छगन भुजबळांनी सांगितलं की, माझ्यावर देखील असेच आरोप झालेले होते. बीजेपीची सीबीआय होती आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारमध्ये होतो.ए सीबीआयच्या त्या रिपोर्टमध्ये, चार्जशीटमध्ये भुजबळ हे नाव आलेलं नव्हतं. त्यामुळे माझं उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद गेलं. एक प्रकारचा कलंक माझ्यावर लागला, माझं पद गेलं, मला त्रास झाला. असं कोणालाही होवू नये, असं मी उदाहरण देवून सांगितलेलं असल्याचं छगन भुजबळ आज म्हणाले आहेत. धनंजय मुंडेंवर आरोप नसताना राजीनामा घेणे योग्य नाही, हे मीच पहिलं बोललो होतो. असं अंजली दमानियांना भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री बघतील काय करायचे ते, असं देखील यावेळी भुजबळांनी स्पष्ट केलंय.

Anjali Damania Live : धनंजय मुंडेंची धाकधूक वाढली; दमानियांच्या पत्रकार परिषदेनंतर राजीनामा?

राज्यपाल पदावर बोलताना भुजबळ म्हणाले की, मला पद ऑफर केलेलं नाही. मी सर्वसामान्य आणि मागासवर्गीय लोकांमध्ये काम करणारा माणूस आहे. त्यांच्यावर संकटे येतात, त्यासाठी मला पुढे येऊन लढावे लागतं. त्यामुळे राज्यपाल पद असल्यावर पुढे येता येणार नाही. त्यामुळे मागासवर्गीय यांच्यापेक्षा मोठं पद नाही, असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. अंजली दमानिया आज पत्रकार परिषदेमध्ये पुरावे दाखवणार आहेत, यावर बोलताना भुजबळांनी म्हटलंय की, ठीक आहे. मी काय बोलणार त्याच्यावर? तूर्तास बोलणं योग्य नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us