Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी आयोगावर सवाल उपस्थित केला ते म्हणाले ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे याबद्दल माझ्या मनात शंका आहे. आज (6 जानेवारी) पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाकडून ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी छगन भुजबळ बोलत होते.
साडेचार लाख वेतन, विमान प्रवास अन् बरंच काही… मराठा आरक्षण सल्लागार मंडळाला ‘क्लास वन’ सुविधा
यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप होऊ नये. अशी पुन्हा एकदा भूमिका जाहीर केली. यावेळी ते म्हणाले की, आज अन्याय करणारे बदलले आहेत. त्यामुळे आपल्यावर अन्याय करतील त्यांच्या विरोधात आवाज उठवायला हवा. त्याचबरोबर त्यांनी यावेळी मराठा समाजासाठी आरक्षण मागणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली ते म्हणाले, समोरच्यांच्या लोकांच्या मागण्या खूप आहेत. त्यांची लेकर-बाळ गरीब आहेत. म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. पण त्यांच्याकडेच 200 जेसीबी आहेत. तेही फुलं उधळण्यासाठी हेलिकॉप्टरमधूनही फुलांचा वर्षाव केला जातोय. पण ते गरीब आहेत. असं म्हणत भुजबळांनी जरांगेंच्या भव्यसभांवरती टोला लगावला आहे.
रिव्हर व्ह्यू सिटी : 500 एकरात साकारलं जातयं निसर्गाचा सहवास देणारं शहर
तसेच जरांगेंनी आपल्या येवला मतदार संघामध्ये सभा घेतली होती. त्यावेळी जेसीबीमधून बकेटने फुलांची उधळण करणाऱ्या एक जणांचा अपघात झाला होता. हा देखील किस्सा सांगितला. तसेच यावेळी त्यांनी सांगितलं की, मराठ्यांनी दहा काय बारा टक्के आरक्षण घ्यावं. पण ते स्वतंत्र घ्यावं ओबीस मधून हे आरक्षण मिळणार नाही. अशी थेट भूमिका यावेळी पुन्हा एकदा भुजबळांनी घेतली.
Ahmednagar : बारामती अॅग्रोवरील कारवाईचा निषेध; कर्जत कडकडीत बंद…
यावेळी भुजबळ यांनी ओबीसी आयोगावर सवाल उपस्थित केला. ते म्हणाले तो ओबीसी आयोग आहे की, मराठा आयोग आहे. याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण ओबीसी आयोगातील पूर्वीच्या सर्व लोकांनी राजीनामे दिले आहेत. आता नवीन आलेल्या लोकांना काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणावर काम करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र आमचा मराठा आरक्षणाला विरोध नसून आरक्षणाच्या नावाखालीच सुरू असलेल्या झुंडशाहीला आमचा विरोध आहे. असं म्हणत यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.