Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याचा (Chhagan Bhujbal) पदभारही स्वीकारला. खरंतर भुजबळांना आधी मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज झाले होते. परंतु, आता त्यांना पु्न्हा मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. मधल्या काळात पक्षाकडून मिळालेली वागणूक, विधानसभा निवडणुकीनंतरचा काळ यावर छगन भुजबळांनी मोठे खुलासे केले. निवडणूक जिंकल्यानंतर मला पक्षानेच आमदारकीचा राजीनामा देण्यातची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. तुम्हाला राज्यसभेची ऑफर का देण्यात आली होती? असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, लोकसभेला मला तिकीट देण्याचं दिल्लीत ठरलं होतं. नंतर होळीच्या दिवशी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी मला निवडणुकीला उभं राहा असं सांगितलं. नंतर मात्र माझं नावच जाहीर करण्यात आलं नाही. मीही म्हटलं आता मी लढत नाही काय करायचं ते करा.
चौंडी विकास आराखड्याचा शासन निर्णय लवकरच; सभापती प्रा. शिंदे यांची माहिती
नंतर राज्यसभेची निवडणूक आली. लोकसभा निवडणुकीत पक्षाची वाताहत झाली होती. त्यावेळी सरकार येईल की नाही अशी शंका होती. नितीन पाटील यांना उभं केलं. का तर तुम्ही येथे पाहिजे असे मला सांगितले. त्यावरही मी हो म्हटलं. पण नंतर सराटीचे नेते आल ते बसले. ती लढत अटीतटीची झाली. निवडणूक झाल्यानंतर मला सांगितलं की भुजबळ साहेब आमच्या सगळ्यांचं मत आहे की तुम्ही राजीनामा दिला पाहिजे.
पक्षानं सांगितलं की तु्म्ही आमदारकीचा राजीनामा द्या. इथे तुम्ही राजीनामा द्या तिकडे आम्ही नितीन पाटलांना राजीनामा द्यायला सांगतो. नाशिकमध्ये आम्ही समीर भुजबळांना उभे करतो. तुम्हाला राज्यसभेतच जायचंय ना. पण मी त्यावेळी हे शक्य नाही असं म्हटलं होतं. मंत्रिमंडळातून मला डावलण्यात आल्यानंतर मला अनेक पक्षांकडून ऑफर होत्या असाही मोठा खुलासा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केला.
छगन भुजबळ यांना सुरुवातीला मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. त्यांनी नाराजी बोलावूनही दाखवली होती. परंतु, मधल्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार अजितदादांनी स्वतःच्या हाती घेतला होता. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपदही घेतलं होतं. मंत्रिमंडळात आणि विशेषतः राष्ट्रवादीत अनुभवी मंत्र्याची कमतरता जाणवत होती.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे छगन भुजबळांची नाराजी फार काळ परवडणारी नाही असा विचार पक्षात सुरू होताच. यांसह अन्य गोष्टींचा विचार करुन अखेर छगन भुजबळांना पुन्हा सन्मानाने मंत्रिमंडळात घेण्यात आलं. त्यांना आता कोणतं खातं मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. भुजबळांनी तर मला कोणतंही खातं दिलं तरी चालेल असं आधीच सांगून टाकलं होतं. परंतु, अपेक्षेप्रमाणे त्यांना अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात आलं. याआधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात, त्यानंतर शिंदे सरकारच्या काळात भुजबळांकडं हे खातं होतं.आता तिसऱ्यांदा हेच खात भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.
भुजबळांच्या दालनात कुणाचे फोटो? पत्रकाराचा प्रश्न अन् भुजबळांचं मन जिंकणारं उत्तर