Download App

Commits Suicide : तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं संपवलं जीवन; प्रेम कर म्हणून रोज…

रोजच्या प्रेम कर या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन मुलीने आत्महत्या केली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका बीएचएमएस करणाऱ्या तरुणीने वसतिगृहात आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांना आता एकतर्फी प्रेमातून एक तरुण एका मुलीला त्रास देत असल्यानं कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीनं विहिरीत उडी मारून जीवन संपवलं आहे. ही घटना जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात घडली आहे. (Chhatrapati Sambhaji) आरोपी तरुण तरुणीला ‘माझ्यावर प्रेम कर’ अशी जबरदस्ती करत होता.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक बळी;माझ्या लेकरांना आरक्षण द्या चिठ्ठी लिहून ठेवत केली आत्महत्या

मुलगा पीडित मुलीला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने जीव दिला आहे. या घटनेमुळे तरुणीचे कुटुंबीय संतप्त झाले असून आरोपी तरुणाला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा ओहर या गावात एका गॅरेजमध्ये कामाला होता. हा तरुण हरसुल येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. तू माझ्यावर प्रेम कर अशी सातत्याने हा तरुण तरुणीकडे मागणी करत होता. हा तरुण रोज त्रास देत असल्याने पीडित मुलीने गावातील एका विहिरीत उडी मारून जीव दिला.

मन सुन्न करणारी घटना! लेकीच्या घरीच वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

मृत मुलगी ही अभ्यासात हुशार होती. ती अकरावीमध्ये सायन्समध्ये शिकत होती. शहरात एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये तिने क्लास लावला होता. त्यामुळे ती शहरात राहत होती. रक्षाबंधनासाठी ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे गेली होती. आरोपी मुलगा हा पूजाला गेल्या ८ महिन्यांपासून त्रास देत होता. ही बाब तिने तिच्या घरच्यांना देखील सांगितली होती. पूजाच्या कुटुंबीयांनी तरुणाला चोप देखील दिला होता. मात्र, त्याचा त्रास सुरूच होता. अखेर याला कंटाळून तरुणीने विहिरीत उडी मारून जीव दिला.

follow us