मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक बळी; ‘माझ्या लेकरांना आरक्षण द्या’ चिठ्ठी लिहून ठेवत केली आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक बळी; ‘माझ्या लेकरांना आरक्षण द्या’ चिठ्ठी लिहून ठेवत केली आत्महत्या

Suicide for Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सध्या लढा सुरूच आहे. (Reservation ) दरम्यान, अनेक लोकांनी यामध्ये अस्वस्थ होत आत्महत्या केल्या आहेत. अशीच घटना समोर आली आहे. (Maratha Reservation) मराठा आरक्षणासाठी ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Suicide) ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच वाळूज औद्योगिक वसाहत परिसर पोलिसांनी याचा तपास सुरू केला.

चिठ्ठी सापडली विरोधी पक्षनेते राहुल गांधी अलिगडला पोहचले; हाथरस सत्संग चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबाची घेतली भेट

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव सोपान दशरथ सातपुते (वय ४०, रा. एकलहेरा, ता. गंगापूर, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी) असं आहे. पोलिसांना त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडल्याने त्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं उघडं झालं आहे. सोपान सातपुते हे रांजणगाव शेणपुंजीत श्रीरामनगरातील अशोक शेजूळ यांच्या घरात भाड्याने राहत होते. सोबत पत्नी ज्योती (वय ३५), मुलगा ऋषीकेश (१६) व मुलगी कीर्ती (१२) असा त्यांचा परिवार आहे.

लेकरांना आरक्षण द्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शेअर बाजारातील तेजीबद्दल व्यक्त केली चिंता, सेबीला केल्या विशेष सूचना

पोलिसांना सोपान सातपुते यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये ‘जय शिवराय, जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळणार आहे का? शेतात पिकत नाही. नोकरी नाही. समाजाला सरकार खेळवत आहे. पाटील मला माफ करा. माझ्या लेकरांना आणि समाजाला आरक्षण द्या’. तर पत्नी ज्योती यांना उद्देशून ‘ज्योती, मला माफ कर. नाना, दादा व दीदीला सांभाळा.’ पाटील आरक्षण घ्या. तुमचाच सोपान… जय शिवराय’ असा मजकूर चिठ्ठीत लिहून ठेवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube