मन सुन्न करणारी घटना! लेकीच्या घरीच वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

मन सुन्न करणारी घटना! लेकीच्या घरीच वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Elderly Couple Suicide : नागपुरच्या चंदनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. (Suicide) प्रत्येकाच्या जिवाला चटका लावून जाणारी ही घटना आहे. येथे आपल्या मुलीच्या घरी वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (Couple Suicide) श्रीराम बापुराव कटरे (वय ८५) व त्यांच्या पत्नी शकुंतला (वय ८२) अशी मृतांची नावं आहेत. (Gst) आपलं म्हातारपणात किती दिवस मुलींच्या घरी काढायचं. किती दिवस त्यांच्यावर ओझे म्हणून राहावं अशा विचारातून या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लग्नानिमित्त नातेवाइकांच्या गाठीभेटी

मृत कटरे दाम्पत्याला पाच मुली आहेत. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी मुलींना वाढवंलेल आहे. कटरे हे अमरावतीच्या यशोदानगर येथील रहिवासी होते.वय वाढत गेलं तसं आजार आणि दवाखाने नित्याचे झाले. मुली आळीपाळीने वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करत होते. नातवाचे लग्न असल्याने ते चंदननगर येथे आपल्या मुलीकडे आले होते. नातवाचे महिनाभरापूर्वी धूमधडाक्यात लग्न झालं. या आनंदात कटरे दाम्पत्यही सहभागी झालं. लग्नानिमित्त नातेवाइकांच्या गाठीभेटी झाल्या. घरात आनंदाचं वातावरण असताना या दाम्पत्याच्या मनात वेगळेच विचारचक्र सुरू झालं. मुलींवर आता आपला भार नको. अशा विचारचक्रातून त्यांनी अखेर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असाव असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

घरी कुणी नसताना निर्णय ऊस उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर करणार 40 टक्के वाढणार उत्पादन; शरद पवारांची माहिती

नातेवाइकाचा वाढदिवस असल्याने मुलीच्या घरचे अन्य सारे हुडकेश्वर येथे गेले. याच काळात वृद्ध दाम्पत्य घरी दोघच असल्याने त्यांनी आपलं जीवन संपवलं. कुटुंब रात्री साडेअकराच्या सुमारास घरी आलं. खूप वेळ आवाज देऊनही कुणी दरवाजा उघडला नाही. मुलाने मागच्या दरवाजाने कसाबसा घरात प्रवेश केला. दरम्यान, त्याने समोरचं धक्कादायक चित्र पाहिलं आणि त्याचे एकच हुंदका फोडला. पुढे ही घटना पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

निर्णय नेमका पतीचा की पत्नीचा Manoj Jarange : मोठी बातमी! अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

कटरे दाम्पत्याने अचानक निर्णय घेतला नसावा. त्यांच्या मनात अनेक दिवसांपासून विचित्र घालमेल सुरू असावी, असाही अंदाज आहे. या दाम्पत्यापैकी आत्महत्या करण्याचा निर्णय नेमका पतीचा की पत्नीचा आणि घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्याविषयी मन कसं तयार झालं, हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. वाढत्या वयामुळे येणाऱ्या मर्यादा, त्यामुळे कुटुंबाची होणारी परवड हे या निर्णयामागचं कारण असावं का? याचा पोलीस तपास करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube