GST Council Meeting: रेल्वेची सेवा जीएसटीबाहेर, पण दूधाचे कॅन, सोलर कूकर महागणार

  • Written By: Published:
GST Council Meeting: रेल्वेची सेवा जीएसटीबाहेर, पण दूधाचे कॅन, सोलर कूकर महागणार

Nirmala Sitharaman GST Council Meeting: अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर (GST Council) परिषदेची बैठक झाली. या बैठकीत रेल्वेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा, प्लॅटफॉर्म तिकिटे, बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांना जीएसटीमधून सूट देण्यात आलीय. परंतु पॅकेज डब्बामधील दुधाला बारा टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जीएसटीचे बनावट बिले रोखण्यासाठी देशभरात बायोमेट्रिक प्रणाली टप्पाटप्पाने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. (ST Council Meeting: Railway services out of GST, but milk cans, solar cookers will be expensive)

रेल्वेच्या सेवा जीएसटी बाहेर

भारतीय रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा जीएसटी बाहेर ठेवण्याचा शिफारस करण्यात आली आहे. त्यात प्लॅटफॉर्म तिकीट, रिटायरिंग रुम, वेटिंग रुम सुविधा आणि बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांचा समावेश आहे.

सोलर कूकर, दुधाचे कॅन (डब्बे) व कॉर्न बॉक्सवर बारा टक्के कर

दूधाच्या कॅनवर बारा टक्के कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रकारच्या कार्टन बॉक्सवर, सोलर कूकरवर, फायर स्प्रिंकलर साहित्यवर बारा टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. स्टील, अॅल्युमिनियचा दुधाच्या डब्बांवर हा कर लागू होणार आहे.

पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणणार?

पेट्रोल, डिझेल हे जीएसटीमध्ये आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज नाही. त्यासाठी राज्यांनी केंद्राबरोबर सहभागी होऊन इंधनाच्या जीएसटीबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच दर निश्चित करण्यासाठी मंत्र्यांच्या समितीची स्थापना करण्यात येईल. ही समिती जीएसटी परिषदेला अहवाल देईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube