Chhatrapati Sambhaji Raje on Dhananjay Munde : काल राज्यपालांना भेटलो. मुख्यमंत्र्यांकडेही वेळ मागितलेली आहे. कराडवर खंडणीच जे कलम लावलय त्यापेक्षा हत्येच कलम 302 लावलं पाहिजे अशी मागणी संभाजी राजे यांनी केली. ही सगळी माणस कोणाची आहेत? वाल्मिक कराड जवळचा आहे, हे धनंजय मुंडे स्वत: मान्य करतात. (Dhananjay Munde) त्यांचे व्यावसायिक अकाऊंट एकत्र आहेत असा थेट आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
Dhananjay Munde: मोठी बातमी! धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवल्याची माहिती
धनंजय मुंडे यांनी मोठ्या मनाने राजीनामा दिला पाहिजे. अशोक चव्हाण, आर.आर.पाटील यांनी आधी राजीनामा दिला, मग ते पुन्हा सत्तेत आले. तुम्ही सुद्धा तसेच पुन्हा सत्तेवर या. वाल्मिक कराड तुमचा जवळचा माणूस आहे, हे मान्य करता तरीही हे सर्व चालू आहे. मला आश्चर्य आहे, मुख्यमंत्री, अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला एवढं घाबरताय. कुठल्याही सामान्य माणसाला बीडमध्ये विचारलं, हे सात जण कोणाचे? वाल्मिक कराड कोणाचा? उत्तर एकच येणार, सरकार का घाबरतय? अशी टीकाही संभाजी राजे यांनी केली.
ओबीसीमध्ये आहे, म्हणून धक्का द्यायच नाही का? काल सर्वपक्षीय राज्यापालांना भेटले, त्यामध्ये ओबीसी सुद्धा होते. ओबीसी, मराठा या पलीकडचा विषय आहे. ही माणुसकीची हत्या आहे. महाराष्ट्रभर हे पसरलं, तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का?. संतोष देशमुख यांचा भाऊ, मुलगी यांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागतं हे चुकीच आहे असंही ते म्हणाले आहेत.
अजितदादांच मला आश्चर्य वाटतं. परखडपणे विषय मांडता. छोट्यात छोट्या मुलाला विचारलं, यात दोषी कोण? खून कोणी केला? सगळं सांगतिलं, तरी अभय देता. काल सकाळी राज्यपालांना भेटलो. त्यानंतर मंत्रालयात गेलो होतो, त्यावेळी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात अर्धातास चर्चा झाली. एवढी चर्चा करता, म्हणजे काहीतरी विषय असणारच ना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, आम्ही मूर्ख आहोत का? हे सगळं बंद करा असंही संभाजी राजे म्हणाले आहेत.