Download App

‘हे महाराष्ट्राला शोभतं का?’ कृषिमंत्री धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न; शेतकऱ्यांच्या वेदनेच काय?

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या वेदना दुःख मोठआहे. पण धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhaji Raje :मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून दुःख होत आहे. पण कृषिमंत्री धनंजय मुंडे पीक नुकसानीची पाहणी करण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे महाराष्ट्राला शोभते का? असा प्रश्न स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.

नारायणपूर येथील सद्गुरू नारायण महाराज यांचं वृद्धापकाळानं निधन; ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तालुक्यातील उंचडा, मार्लेगाव आणि धानोरा या गावांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान पाहून अत्यंत दुःखी झालो आहे. एवढे नुकसान झाले आहे, तरीही आमदार, खासदार तर सोडाच कृषिमंत्रीही पाहणीला आले नाहीत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते व्यस्त आहेत.

जीवन संपण्याचा विचार करू नका

मदत न मिळाल्यास जीवन संपवण्याशिवाय मला पर्याय नाही असं चव्हाण नावाच्या एका शेतकऱ्यानं संभाजीराजे छत्रपती यांना सांगितलं. त्यावर, ‘स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शासनाची मदत मिळेपर्यंत वाट पाहणार नाही. दहा दिवसांत पक्षाकडून मदत देणार, जीवन संपवण्याचा विचार मनात आणू नका’ असं आश्वासन संभाजीराजे यांनी दिलं.

follow us