भावाने मागितलं असतं तर पक्षच काय, सगळंच देऊन…; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

भावाने मागितलं असतं तर पक्षच काय, सगळंच देऊन…; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Supriya Sule : बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) एक मोठं वक्तव्य केलं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) उमेदवारी देऊन चूक केली. आता मला वाटतंय की हा निर्णय चुकीचा होता, असं अजितदादांनी एका मुलाखतीत म्हटल होतं. त्यावर शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केलं.

… म्हणून हसन मुश्रीफ यांनी पवारांची साथ सोडली, रोहित पवारांचा गंभीर आरोप

भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह काय? सगळंच देऊन टाकलं असंत, असं सुळे म्हणाल्या.

शरदचंद्र पवार पक्षाची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेत बोलतांना सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी महायुती सरकावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, राज्यात अनेक वर्षे राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळी शेतकऱ्यांचा सातबारा केला होता. तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती. मात्र त्यावेळी कोणीही असं म्हटलं नाही की, आम्ही सातबारा कोरा केला, आम्हाला मतदान झालं नाही तर पुन्हा आम्ही तुमच्या सातबाऱ्यावर कर्ज करू. आताचं जे सरकार आहे, त्या सरकारला तुमच्या-माझ्या सुख-दु:खाचं काही नाही. हे भावा-बहिणींच्या नात्याला 1500 रुपयांची किंमत लावत आहेत, अशी टीका सुळेंनी केली.

दुलीप ट्रॉफी 2024 साठी संघाची घोषित, श्रेयस अय्यर, शुभमन गिलसह ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी 

पुढं त्या म्हणाल्या, बहिणींचं प्रेम कधीतरी बघा. ही बहीण फक्त 1500 रुपयांसाठी भावावर प्रेम करत नाही, तर मनापासून प्रेम करते. भावाने मागितले असतें तर सर्व काही देऊन टाकलं असतं, पक्ष आणि चिन्ह काय? सगळं देऊन टाकल असतं, असं विधान सुळेंनी केलं.

लोकसभेनंतर बहीण लाडकी वाटायला लागली

सत्तेत आल्यानंतर राज्यातील सर्वच सरकारे चांगली कामं करतात. पण या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचा टायमिंग पाहा. त्यांना कधीही बहीण लाडकी वाटला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना बहीण लाडकी वाटायला लागली. त्यांना नाते आणि व्यवहार यातील फरक कळत नाही. व्यवहारात पैसे असतात. नात्यात प्रेम आणि विश्वास असतो. नात्यामध्ये पैसे घेत नाही आणि व्यवहारात प्रेम आणि नातं येत नाही. महाराष्ट्रातील महिला खूप स्वाभिमानी आहेत. तुम्ही 1500 रुपये देत आहात तर तुमचे आभारी आहोत. पण, जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला 1,500 रुपये देऊन आम्ही नात्यात वाहवत जाऊ, तर हा गैरसमज आहे, असं सुळे म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube