अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंनी केलं अजितदादांचं कौतुक
Raj Thackeray on Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा (Raj Thackeray) मराठवाडा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात राज ठाकरे काल बीड येथे त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या. दौऱ्यात अन्य काही ठिकाणी त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. या सगळ्या घडामोडींवर आज राज ठाकरे यांनी भाष्य केलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तर अजित पवार यांचं कौतुक केलं. राज ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अजितदादांचं कौतुक केलं.
80 वर्षाचा माणूस म्हणतोय मणिपूर होईल, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न.. राज ठाकरेंची पवारांवर टीका
अजित पवार यांच्याबरोबर माझे कितीही मतभेद असले तरी एक गोष्ट सांगतो की त्यांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही. सर्वांनीच जातीचं राजकारण केलं. पण मी तुम्हाला अजित पवारांबद्दल खात्रीशीरपणे सांगू शकतो की त्यांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही. अजित पवार कधीच जातीच्या राजकारणात पडले नाहीत. निदान मी तरी त्यांच्या तोंडून तसे वक्तव्य कधीच ऐकले नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
माझ्या नादी लागू नका नाहीतर..
दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. ज्या मोदींनी बारामतीमध्ये सांगितलं मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. मग त्या मोदींकडे पवार साहेब आरक्षण बद्दल का बोलले नाही. उद्धव ठाकरे पाच वर्ष होते त्यांनी का बोलले नाहीत. तुमचं राजकारण तुम्हालाच लख लाभ. पण माझ्या नादाला लागू नका, माझी मुलं काय करतील हे सांगता येणार नाही. तु्म्हाला घरी जाऊन पाठ, गाल बघावे लागतील असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
काल बीडमध्ये जो प्रकार घडला त्यात ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख होता. लोकसभेच्या निकालानंतर या लोकांना वाटलं की मराठवाड्यात आपल्याला मतदान झालं. तेव्हा या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे मतदान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह यांच्या (Amit Shah) विरोधात झालेलं मतदान आहे. विरोधकांच्या प्रेमामुळे हे मतदान झालेलं नाही. आता विधानसभा निवडणुकीतही अशीच खेळी करावी असे या लोकांना (उद्धव ठाकरे, शरद पवार) वाटत आहे.
Raj Thackery : पायाखालची जमीन चाललीय मराठी माणसाला अंदाज आहे का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल