83 वर्षाचा माणूस म्हणतोय मणिपूर होईल, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न…; राज ठाकरेंची पवारांवर टीका

83  वर्षाचा माणूस म्हणतोय मणिपूर होईल, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न…; राज ठाकरेंची पवारांवर टीका

Raj Thackeray on Sharad Pawar : अलीकडेच शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, असं विधान केलं होतं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या जातीय संघर्षावरून त्यांनी हे विधान केलं होतं. दरम्यान, पवारांच्या याच वक्तव्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

BB Marathi: भाऊच्या धक्क्यावर रितेश सगळ्यांचा क्लास घेणार; ‘या’ आठवड्यात कोणाची घेणार शाळा 

राज ठाकरेंनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खास ठाकरी शैलीत अनेक मुद्यांवर सडेतोड भूमिका मांडली. जातीय संघर्षावर बोलतांना ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या पाठीमागून शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे काम करत आहे. इथे पत्रकारही काम करत आहेत. काहींना एमआयडीसी जागा मिळाल्या आहेत. कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. धाराशिवमध्ये लोकांना भडकवण्याचा काम पत्रकार करत होते,असा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयद्वेष सुरू…
पुढं बोलताना ते म्हणाले की, येत्या साडेतीन महिन्यांत त्यांना दंगल घडवायच्या आहेत. फक्त मराठवाड्यातच दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांचं राजकारण पाहिलं तर जेम्स लेन प्रकरणापासून सुरू केलं. ते स्टेप बाय स्टेप सुरू आहे. जातीबद्दल प्रेम वर्षानुवर्षे आहे. ते फक्त महाराष्ट्रात नाही. पण, दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांनी सुरू केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.

Aamir Khan: किरण रावच्या ‘लापता लेडीज’च्या निर्मितीमागे आमिरचा मास्टर प्लॅन काय होता? जाणून घ्या…. 

त्यांना वाटत असेल की त्यांचे इतके खासदार निवडून आलेत तर ज्या खासदारकीवर यांनी जाऊ नये. यांचा राग देवेंद्र फडणवीसांवर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बोला. समाजामध्ये कशाला भांडणं लावत आहात? असा सवाल त्यांनी केला.

83 वर्षांचा माणूस मणिपूर होईल म्हणत आहे. यांना मणिपूर होऊ नये यासाठी विचार करायला हवा होता. पण, यांना जेवढ्या दंगली घडवायच्या आहेत, तेवढ्या घडवणार आहेत. माझी सर्व समाजातील बांधवांना विनंती आहे की, यांच्या नादी लागू नका… निवडणुका येतील आणि जातील. मात्र या जखमा भरून निघणार नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube