… तर गोरेगाव फिल्म सिटीच्या बाहेर उपोषणाला बसणार, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा इशारा

… तर गोरेगाव फिल्म सिटीच्या बाहेर उपोषणाला बसणार, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा इशारा

Babasaheb Patil : गेल्या अनेक दिवसापासून मराठी चित्रपट निर्मात्याच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष अभिनेत्री गार्गी फुले, अखिल भारतीय मराठी निर्माता महामंडळ,आणि अनेक मराठी निर्माते आम्ही विविध स्तरावरती प्रयत्न करीत आहोत.

काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीमध्ये आमची पहिली बैठक सकारात्मक झाली, त्यानंतर दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या मुख्य व्यवस्थापिका स्वाती म्हसे पाटील यांच्या ऑफिसमध्ये देखील मराठी चित्रपट निर्मात्यांना घेऊन एक बैठक झाली.

या बैठकीमध्ये अनेक विषय चर्चेत घेण्यात आले आणि या बैठकीनंतर फिल्म सिटीकडून देखील अधिकाऱ्यांनी झालेल्या मीटिंगच्या संदर्भात सकारात्मक अहवाल मंत्र्यालयात पाठवला, मात्र सतत सकारात्मक चर्चेनंतर सुद्धा अद्यापही मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पदरी निराशा आली आहे. अद्यापही कुठलाही जीआर या संदर्भात काढला गेला नाही, त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्र्यांनी देखील अनेक विविध योजनांबद्दल जाहीर घोषणा करून देखील त्याबाबतीतला जीआर अद्याप आलेला नाही या सर्व गोष्टींमुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली जात आहे, म्हणून या सर्व बाबींचा विचार करून आता आम्ही लोकशाहीच्या मार्गातून शासनविरोधात आंदोलन करण्याचे ठरविले आहे.

मराठी चित्रपट निर्मात्यांनी दर्जेदार चित्रपट निर्मिती केली असून शासनाकडे अनुदानासाठी आपले सिनेमे पाठवले होते,दरम्यान यावेळी अनुदान कमिटीने अनेक चित्रपटांना अपात्र करून त्यांना अनुदानापासून वंचित करण्याचा प्रकरण सांस्कृतिक सचिव विकास खारगे त्याचप्रमाणे दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या मुख्य व्यवस्थापिका स्वाती म्हसे पाटिल यांच्या निदर्शनास आणून दिले आणि राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या वतीने निर्मात्यांची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी असे अनेक मुद्दे होते की ज्या मुद्द्यांवर चित्रनगरीचे अधिकारी सकारात्मक होते आणि मीटिंग नंतर तसा रिपोर्टही सकारात्मक मंत्रालयात पाठविण्यात आला, मात्र पोकळ आश्वासन देऊन निर्मात्यांना काही काळासाठी शांत करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय शासन दरबारी न झाल्यामुळे, तसेच आम्ही केलेल्या मागण्यांच्या संदर्भात कुठल्याच प्रकारचा जीआर न काढल्यामुळे नाराज झालेल्या सर्व मराठी निर्मात्यांना घेऊन होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उपोषणाला बसविण्याचे आम्ही ठरविले आहे.

केंद्र सरकारकडून मदत जाहीर; नेपाळ अपघातातील मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाख

5 सप्टेंबरपर्यंत यासंदर्भातला जीआर किंवा सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांना घेऊन आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग तसेच अखिल भारतीय मराठी निर्माता महामंडळ आणि सर्व मराठी चित्रपट निर्माते मिळून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या बाहेर उपोषणाला बसणार आहोत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube