NCP : विधानसभेला अजितदादा किती जागांचा दावा करणार? आकडाच आला समोर
Ncp Ajit Pawar Group : राष्ट्रवादीने (Ncp) 2019 जिंकलेल्या 54 जागांवर दावा करणार असल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना सांगितलंय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलीयं. त्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. अशातच आता महायुतीतील तिन्ही घटक पक्षामध्ये जागावाटपाच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकूण हीच चर्चा सुरु असताना अजित पवार यांनी आपला आकडाच सांगून टाकलायं.
…अन् राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, विधानपरिषद निकालानंतर मुश्रीफांचा कॉन्फिडन्स वाढला
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता नेत्यांना विधानसभा निवडणुकीचं वेध लागलंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अजितदादा गटाला अवघ्या 4 जागा मिळाल्या होत्या. तीन जागांपैकी अवघ्या एकच जागेवर अजित पवार गटाला यश आलंय. त्यामुळे आता महायुतीतील सर्वच पक्ष आपापला सर्व्हे करणार आहेत. तिघांचेही सर्व्हे समोर ठेवल्यानंंतर दोन सर्व्हे एका बाजूला जातील तिथं आमचा दावा असणार आहे. त्यामुळे ज्यांचे दोन सर्व्हेत येईल ते मान्य करणार असून 54 जागांवर दावा सांगणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. तसेच 54 जागांमध्ये नवाब मलिक यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात जिथं आमचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर दावा सांगणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
भुजबळ-पवार भेटीमुळे महायुतीत मिठाचा खडा, बावनकुळे म्हणाले, ‘महायुतीचं नुकसान होईल असं…’
लोकसभा निवडणुकीदरम्यान, जागावाटपावरुन महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अनेक जागांवर रस्सीखेच सुरु होती. यामध्ये विषेषत: दक्षिण मुंबईसह मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघ, नाशिक, ठाणे आणि पालघर अशा सहा जागांचा तिढा लवकर सुटला नसल्याचं दिसून आलं होतं. अखेर हा तिढा सुटून भाजपला 28, राष्ट्रवादीला 4, शिंदे गटाला 15 तर 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभेला महायुतीतील तिन्ही घटक पक्ष जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.