Download App

बॅनर वार! पंधरा मिनिटांचं एकच उत्तर; छत्रपती संभाजीनगरमध्ये लागलेल्या बॅनरने उडाली खळबळ

काही वर्षांपूर्वी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंधरा मिनिटांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांची काही

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar Banner : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. (Sambhajinagar) आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून बॅनर लावण्यात आलं आहे, या बॅनरनं खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात हे बॅनर लावण्यात आलं आहे. या मतदारसंघात एमआयएम आणि भाजपमध्ये काटें की टक्कर आहे.

छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरवर पंधरा मिनिटांचं एकच उत्तर शंभर टक्के मतदान असा मजकूर छापण्यात आला आहे. यातील पंधरा मिनिटांचं एकच उत्तर हे अक्षर हिरव्या रंगात छापण्यात आले आहेत, तर शंभर टक्के मतदान हे अक्षर भगव्या रंगात छापण्यात आले आहेत. या बॅनरमुळे या मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

लाडकी बहीण फक्त मतदान करण्यासाठीच, संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रमुख ९ ठिकाणी दोनच महिला उमेदवार

काही वर्षांपूर्वी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंधरा मिनिटांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांची काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सभा पार पडली. या सभेत देखील त्या पंधरा मिनिटांचा उल्लेख आला. त्यानंतर आता त्याला प्रत्युत्तर म्हणून हे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र हे बॅनर नेमकं कोणी लावलं याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

छत्रपती संभाजीनगरात अज्ञात व्यक्तीकडून हे बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरनंतर या मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात झाली आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयएमकडून इम्तियाज जलील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजपकडून अतूल सावे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

follow us