Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; अंबादास दानवे अन् संदिपान भुमरे भिडले
Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदिपान भूमरे यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते भिडल्याचे पाहायला मिळाले. या नेत्याच्या जोरदार राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यावर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.(Chhatrapati Sambhajinagar Ambadas Danve And Sandipan Bhumare Dispute in DPDC Meeting Video Viral)
Letsupp Special : अजितदादासोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का?
यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कशाप्रकारे निधी वाटप करण्यात आलेला आहे. याची तालुकानिहाय माहिती देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान केली. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी यावर उत्तर देण्याऐवजी वाद घालण्यास सुरुवात केली. यावरून या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झालेली दिसली.
आजपासून माझ्यासाठी ईशा झा हा विषय संपला; हर्षवर्धन जाधवांचा मोठा निर्णय
पालकमंत्री असले तरीही तुम्ही जिल्ह्याचे जहागीरदार नाहीत. आपल्याच मतदारसंघात जास्तीचा निधी देण्याबरोबर इतरही तालुक्यात समान निधी वाटप करण्यात यावा. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघावर अन्याय न करता न्यायपूर्वक निधी देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
परंतु या जिल्ह्याचा मी जहागीरदार असून माझ्या सहमतीशिवाय कोणतेही कार्य या जिल्ह्यात होऊ शकत नाहीत, असा आव पालकमंत्र्यांचा यावेळी होता. यावरही दानवे यांनी पालकमंत्र्यांना समज देत लोकसंख्येनुसार सर्व तालुक्यांना समान निधी देण्यात यावा, असा शासकीय नियम आहे, त्याचे पालन करण्यात यावे, अशी सूचना सुद्धा त्यांनी यावेळी केली.
या घटनेवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, प्रत्येकाला वाटतं की, आम्ही सत्तेत नसतानाही आम्हाला जास्त निधी मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो, त्या आमदारांना निश्चित जास्त निधी मिळतो, हा अलिखित नियम आहे.
पूर्वी तुम्हाला जो निधी दिला जात होता, त्यामध्ये कुठेही कमी केली नाही. तरीही तुम्हाला आणखी वाढीव निधी कशाला पाहिजे? त्यामुळे पालकमंत्री आणि इतर सहकारी संबंधित आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आक्रमक व्हाल आणि अंगावर जाल तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही, असेही आमदार संजय शिरसाट म्हणाले.