Kirtankar Sangeeta Tai killed By Stonning : छत्रपती संभाजीनगरात सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी थैमान घातलंय. वैजापुरात कीर्तनकार संगीताताईंची दगडाने ठेचून हत्या झाल्याची (Kirtankar Sangeeta Tai killed) घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात (Chhatrapati Sambhajinagar) खळबळ असून पोलीस तपास करीत आहेत.आश्रमात घुसून संगीताताई महाराज यांची हत्या केल्याची माहिती मिळतेय. गुन्हेगाराचा (Crime News) शोध सुरू आहे.
दगडाने ठेचून हत्या
वैजापुर येथील एका आश्रमात महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज यांची अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि. 27 जून) रात्री ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
पुरावे गोळा करण्यास सुरुवात
संगीताताई महाराज आपल्या आश्रमात वास्तव्यास होत्या. याच ठिकाणी रात्री अज्ञात व्यक्तीने थेट आश्रमात घुसून त्यांच्या डोक्यावर दगडाने वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, फॉरेन्सिक व श्वान पथकानेही पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
ब्रेकिंग! पुरीतील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 600 हून अधिक भाविक जखमी
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
संगीताताई महाराज यांची हत्या नेमकी कशामुळे व कोणी केली? याचा शोध सध्या सुरू आहे. या खूनामागे कोणतीही व्यक्तिगत वा सामाजिक कारणं आहेत का, याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र एक कीर्तनकार महिला याप्रकारे ठार मारली जाणं हे अतिशय गंभीर असून, जिल्ह्यातील नागरिकांत चिंतेचं वातावरण आहे.