Download App

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार; गृहखातं कुणाकडं राहणार? एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावाहून ठाण्यात परतले. ते सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' शासकीय निवासस्थानी

  • Written By: Last Updated:

 Mahayuti Power Crisis : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावरच (Mahayuti) शिक्कामोर्तब होण्याची शक्यत आहे. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहखाते मिळावं, या मागणीवर ते ठाम असून भाजपची त्यास तयारी नाही. त्यामुळे आता गृहखात्यावरून तिढा असून हे खातं कोणाकडं जाणार, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत.

एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावाहून ठाण्यात परतले. ते सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी आल्यानंतर महायुतीतील खातेवाटप व मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केलं असून नेता निवडीसाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केली जाण्याची शक्यता आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रिपद मिळणार? एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक लोकोपयोगी योजना राबविल्याने व महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याने जनतेने भरभरून मते दिली, असे शिंदे यांनी रविवारी सातारा येथील पत्रकार परिषदेतही नमूद करून महायुतीच्या यशात आपलाही मोठा वाटा असल्याचं व सत्तेतही मोठा सहभाग अपेक्षित असल्याचे संकेत दिले. शिंदे यांच्या अनुपस्थितीतच पवार यांच्याशी चर्चा करून भाजपने शपथविधी समारंभ ५ डिसेंबरला आयोजित करण्याची घोषणा केली.

अजून महायुतीतील तीनही पक्षांना किती मंत्रीपदं मिळावीत, खातेवाटप कसं असावं आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडून मंत्रीपदांसाठी कोणाची निवड केली जाणार, या बाबींवर शिंदे, फडणवीस व पवार यांच्यात सोमवारपासून चर्चा सुरू होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेतून मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून तोडगा निघाला नाही तर पुन्हा दिल्लीत चर्चेची आणखी एक फेरी होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.

follow us