Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहे. आज त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ऑफर दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. असं विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी आता 2029 पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. त्यांनी भोंग्यानविरोधात अनेक निवेदनं दिली. ते कट्टर सावरकरवादी आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही
तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या ऑफरमुळे राज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा एखदा राजकीय भूकंप येणार का? याबाबात आता अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्यासाठी ऑफर देत होते तेव्हा विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.