Download App

शिंदे गद्दार नाही तर खुद्दार, सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच नाही…

रत्नागिरी : एकनाथ शिंदे वफादार आहे, गद्दार नाही खुद्दार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रत्नागिरीच्या खेडमध्ये पार पडली. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेऊन मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. विशेषत: या सभेला लाखो शिवसैनिकांनी हजेरी लावत शक्तीप्रदर्शन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसवरही जोरदार टीका केल्याचं दिसून आले आहेत. ते म्हणाले, ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवलेत, त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांच्या मांडीला मांडील लावून तुम्ही कसे बसू शकतात? असा सवालही ठाकरेंनी शिंदे यांनी केला आहे. तुम्ही हिंदुत्वाशी बेईमानी केल्याचंही त्यांनी म्हटलंय.

तसेच आपल्या देशाची सत्तर वर्षे लूट करणाऱ्या, भारताचे तुकडे करणाऱ्या गॅंगसोबत असणाऱ्या, घराणेशाही लादणाऱ्या लोकांशी तुम्ही आहात, खोके आणि गद्दार म्हणून आणखी किती पाप झाकणार आहात, असा सवालही त्यांनी यावेळी ठाकरेंना केला आहे.

सोनाली कुलकर्णीनं का मागितली माफी? सोशल मीडियावर ट्रोल

तुम्ही काँग्रेसकडे शिवसेना सत्तेसाठी गहाण ठेवली. शिवसेनेला लागलेला हा डाग आम्ही पुसण्याचं काम केलं आहे. मी हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली असं उद्धव ठाकरेंनी विधानसभेत सांगितलं असल्याचाही गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे.

तुम्ही वडील करुन बाळासाहेबांना छोटं करु नका, तुमचे ते वडिल आहेत हे आम्हाला मान्य आहे, मात्र बाळासाहेब आमचे दैवत आहेत. बाळासाहेबांनी कधीच त्यांना जवळ केलं नाही, म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतल्याचं ते म्हणालेत. दरम्यान, बाळासाहेबांचा विचार हीच आमची संपत्ती असून आम्ही घेतलेला निर्णय चूक की बरोबर आता तुम्हीचं सांगा? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन आमदार योगेश कदम यांनी केलं होतं. जाहीर सभेत शिवसेनेचे रामदास कदम, गजानन किर्तीकर, मंत्री दीपक केसरकर, सदानंद चव्हाण, शीतल म्हात्रे, आदी यावेळी उपस्थित होते.

Tags

follow us