मनोज जरांगे यांचे वादळ शांत होणार? मुख्यमंत्री शिंदे घेणार भेट

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचे वादळ शांत होणार? मुख्यमंत्री शिंदे घेणार भेट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचे वादळ शांत होणार? मुख्यमंत्री शिंदे घेणार भेट

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा 17 सप्टेंबरपासून आरक्षणाच्या मागणीवरून उपोषणाला बसणार आहे. मात्र त्यापूर्वी संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. आज खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या एक वर्षांपासून आम्ही न्यायासाठी आंदोलनं करत आहोत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. समाजाशी कोणत्याही प्रकारचा दगाफटका होता कामा नये असा इशारा देखील यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, गोरगरीब समाजाचं कल्ययाण व्हावं, हीच माझी इच्छा आहे. या राज्यातील मराठा आणि कुणबी हा एकच आहे. हैदराबाद ,सातारा, संस्थानचे गॅजेट लागून करून सरकारने दाखल गुन्हे वापस घ्यावे असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

‘दिल्लीहून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा पण …’, अरुण गुजरातींचा विरोधकांना टोला

लवकरच निर्णय होईल : खासदार संदीपान भुमरे 

तर मनोज दादाची भेट मी आज नाही, नेहमीच घेतो. ते उपोषणाला बसत नव्हते, तेव्हा पण भेटायचो, आज पण भेटतो. त्यांनी गॅजेटची जी मागणी केली, त्यासाठी समिती काम करत आहे. उद्या मुख्यमंत्री येणार आहेत, लवकरच निर्णय होईल अशी माहिती खासदार संदीपान भुमरे यांनी दिली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबद्दल काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

हा भगव्याला लागलेला कलंक, तो पुसून काढण्याची वेळ आली, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

Exit mobile version