‘दिल्लीहून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा पण …’, अरुण गुजरातींचा विरोधकांना टोला

  • Written By: Published:
‘दिल्लीहून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा पण …’, अरुण गुजरातींचा विरोधकांना टोला

Arun Gujarati : विधानसभा निवडणुकीत आपल्याला सरकार बदलायचे आहे. 2013 मध्ये कापसाला भाव 7 हजार होता तर 2024 मध्ये देखील कापसाला भाव 7 हजार आहे. या दरम्यान खतांची किंमत वाढली, मजुरी वाढली, बियांची किंमत वाढली मात्र भाव तोच राहिला. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे मात्र हे सरकार बहिरे झाले आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जेष्ठ नेते अरुण गुजराती (Arun Gujarati) यांनी केली. ते आज एका जाहीर सभेत बोलत होते.

या सभेत बोलताना अरुण गुजराती म्हणाले की, जर तुम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांची कामाची शक्ती पाहिली तर निश्चितपणे आपल्याला शरद पवार यांच्या सारखा नेता मिळणार नाही. दिल्लीहून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा. जर पवारांचा उद्ध्वस्त झाला तर महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. थोडं फार इकडं तिकडं झाला पण महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला नाही. 10 पैकी 8 खासदार शरद पवार यांनी निवडून आणले. तर एक खासदार तुतारीमुळे जिंकला नाही नाहीतर 10 पैकी 9 खासदार जिंकले असते असं या सभेत बोलताना अरुण गुजराती म्हणाले.  तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं सरकार यायला पाहिजे. असेही ते म्हणाले.

शरद पवार यांनी मला फार संधी दिली आहे. शरद पवार यांनी मला अर्थमंत्री तसेच राज्य मंत्री पदाची जबाबदारी दिली. जेव्हा आमच्याकडे अर्थ खाते होते तेव्हा या राज्यावर 80 हजार कोटी रुपयांचा कर्ज होतं मात्र आज राज्यावर 8 लाख कोटी कर्ज आहे मात्र लाडकी बहिणीसाठी 46 हजार कोटी रुपये कसे देणार हे आतापर्यंत सरकारने सांगतिले नाही. असेही यावेळी अरुण गुजराती म्हणाले.

हा भगव्याला लागलेला कलंक, तो पुसून काढण्याची वेळ आली, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

तसेच आज महागाई , बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देखील महागाईवर बोलत नाही पण हे प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त शरद पवार यांच्यात आहे असं देखील अरुण गुजराती म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube