Cm Eknath Shinde : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घेण्यात आलेली सभा शेतकऱ्यांच्या शेतात घेण्यात आली होती. सभेदरम्यान मराठा बांधवांची मोठी गर्दी जमली होती. सभेमुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) धावले आहेत. नुकसानग्रस्त 441 शेतकऱ्यांसाठी 32 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा केली आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’सुरू होणार नवे पर्व; समृद्धी अन् शहजादा दिसणार मुख्य भूमिकेत
मराठा आंदोलन सुरु अशतानाच राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपोषणस्थळी पोहोचले होते. सरकारच्या विनवणीनंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला 2 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानूसार मराठा आरक्षणासाठी सरकार ठोस पाऊल उचलत असतानाच आता जालन्याच्या शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिलासा दिला आहे.
Maratha Reservation : दगाफटका केल्यास नेत्यांना मुंबईचे दरवाजे बंद! जरांगेंचा सर्वपक्षीयांना इशारा
आपत्तीत झालेल्या नुकसानीनंतर शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. एखाद्या सभेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा प्रघात नाही. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा उभारण्यात आलेला प्रामाणिक लढा आणि त्यात समाजबांधवांनी घेतलेला उत्स्फुर्त सहभाग लक्षात घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेत जमीनीचे सभास्थान म्हणून वापरल्याने झालेल्या नुकसानासाठी ४४१ शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे.
Ankita Lokhande: बिग बॉस 17च्या घरात अंकिता लोखंडेने तिच्या करिअरबद्दल सांगितली खास गोष्ट
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांवरील उपचारासाठीही मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाखांहून अधिक रुपयांचे अर्थसहाय्य केले होते, त्यानंतर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत केल्याने शेतकरी बांधवांकडून मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानण्यात आले आहे.