Download App

आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे एप्रिलमध्ये अयोध्या दौऱ्यावर?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या एप्रिल महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेचे खासदार, आमदार अयोध्या दौरा करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचं शिष्टमंडळ अयोध्येत गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्ये दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी जाऊन आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; माजी ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची महिनाभरापासून याची चर्चा सुरु आहे. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे शरयू नदीकाठी धार्मिक विधींमध्ये भाग घेणार आहेत. महाराष्ट्रात घडलेल्या सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्रिपदी विरामान झाल्यानंतर शिंदे यांचा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. शिवसेनेतून बंडखोरी करण्याआधी काही दिवस आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते.

पहाटेच्या शपथविधीपासून एक फूल दो कॉंटेची थेरं; राज ठाकरेंचा घणाघात

दरम्यान, 2019 मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत युती केली. तसेच भाजपसोबतची युती तोडली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मागील तीन दशकांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते. आता एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जात आपला पक्ष हिंदुत्ववादी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न आहे.

सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार शिंदे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. अशात आता मुख्यमंत्री अयोध्या दौरा करणार असल्याने हा दौरा विरोधकांच्या जिव्हारी लागणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us