सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; माजी ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; माजी ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Crime : प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या (Sonu Nigam) वडिलांच्या घरातून 72 लाख रुपये चोरी प्रकरणात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यांच्या माजी ड्रायव्हरला अटक केली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सोनू निगमच्या वडिलांच्या माजी ड्रायव्हरला गजाआड केले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी दावा केला, की सोनू निगमच्या 76 वर्षीय वडिलांच्या माजी ड्रायव्हरला मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली.

सोनू निगमचे वडील आगमकुमार निगम हे ओशिवरा येथील विंडसर ग्रँड बिल्डिंगमध्ये राहतात. 19 मार्च ते 20 मार्च दरम्यान ही घटना घडली होती. त्यानंतर सोनू निगमची बहीण निकीती हीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आगम कुमार यांच्याकडे हा ड्रायव्हर मागील आठ महिन्यांपासून कार्यरत होता मात्र, त्याला नुकतेच कामावरून काढून टाकण्यात आले होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा : ऐश्वर्या रजनीकांतच्या दागिन्यांची चोरी करणं पडलं महागात; घरातल्या ‘या’ सदस्यावर गुन्हा 

आगम कुमार रविवारी (19 मार्च) दुपारी जेवण करण्यासाठी वर्सोवा भागातील निकिताच्या घरी गेले होते. नंतर परत आले. त्यानंतर त्यांनी मुलीला संध्याकाळी फोन करून कपाटात ठेवलेल्या डिजिटल लॉकरमधून ४० लाख रुपये गहाळ झाल्याची माहिती दिली. दुसर्‍या दिवशी, आगम कुमार व्हिसा संबंधित काही कामासाठी त्यांच्या मुलाच्या घरी गेले होते आणि संध्याकाळी परत आले. त्यावेळी त्यांना लॉकरमधील आणखी 32 लाख रुपये गहाळ झाल्याचे लक्षात आले.

तक्रारीत म्हटल्यानुसार आगमकुमार यांचा रेहान नावाचा माजी ड्रायव्हर डुप्लीकेट चावीचा वापर करून फ्लॅटमध्ये दाखल झाला आणि त्याने बेडरूमच्या लॉकरमधील 72 लाख रुपये चोरी केल्याचा संशय आहे. आगम कुमार आणि निकिता यांनी नंतर सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये रेहान दोन्ही दिवस बाहेर असताना बॅग घेऊन त्यांच्या फ्लॅटकडे जात असल्याचे दिसले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Sonu Nigam : ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाकडून सोनू निगमला धक्का-बुक्की ? व्हिडीओ व्हायरल

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ओशिवरा पोलिसांनी निकिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube