Download App

मुसळधार पावसात भरधाव थारची रिक्षाला धडक! 5 जणांचा जागीच मृत्यू, चिपळूणमध्ये भीषण अपघात

Chiplun Accident Thar Overturns Rickshaw In Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun Accident) परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पावसात भीषण अपघात झाला. कराड-चिपळूण महामार्गावरील पिंपळी गावाजवळ भरधाव थार जीपने समोरून येणाऱ्या प्रवासी रिक्षाला जोरदार (Thar Overturns Rickshaw) धडक दिली. या अपघातात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दीड वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर तातडीने वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची भीषणता

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील मूळ रहिवासी असलेला थार चालक आपल्या मुलाला घेऊन वेगाने निघाला होता. पिंपळी गावाजवळ त्याच्या जीपने समोरून येणाऱ्या प्रवासी रिक्षाला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा पूर्णतः चक्काचूर झाला. अपघातानंतर थार जीप पुढे जाऊन एका ट्रकला जाऊन धडकली. त्यामुळे थार गाडीचेदेखील मोठे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर थारमधील एका लहान मुलीचे रडण्याचे आणि ‘मला वाचवा’ अशी हाक मारण्याचे आवाज ऐकू येत होते. सुदैवाने ती मुलगी गंभीर जखमी न होता सुखरूप वाचली.

तुमच्यावर कठोर कारवाई होणार, देशाची माफी मागा म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींचा इशारा

मृतांची नावे

या भीषण दुर्घटनेत रिक्षातील चौघे प्रवासी आणि थारचा चालक अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपळी नुराणी मोहल्ल्यातील

शबाना मियां सय्यद
हैदर नियाज सय्यद
नियाज हुसेन सय्यद
रिक्षा चालक इब्राहिम इस्माईल लोणी

यांचा समावेश आहे. तसेच थारचा चालकही ठार झाला आहे. मृतांपैकी एका दाम्पत्यासह त्यांचा मुलगाही या अपघातात मृत्यूमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. थार चालकाचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

तुमच्यावर कठोर कारवाई होणार, देशाची माफी मागा म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींचा इशारा

पोलिसांचा तपास

अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर मदतकार्य करून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे कराड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. सध्या या अपघाताचा पुढील तपास सुरू असून थार चालक वेगात गाडी चालवत होता का, तसेच अपघाताचे नेमके कारण काय हे पोलीस तपासत आहेत.

 

follow us