Download App

Pradnya Satav यांच्यावरील हल्ल्यावरुन चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…

मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Late Congress leader Rajiv Satav)यांच्या पत्नी व विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav)यांच्यावर बुधवारी हिंगोली (Hingoli)जिल्ह्यात हल्ला झाला. याप्रकरणी प्रज्ञा सातव यांनी पोलिसांत (Police)तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर गर्दीत असतांना एका दारूड्यानं हातानं त्यांच्या मानेजवळ फटका मारला याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना वेळीअवेळी फिरावं लागतं. लोकांच्या गर्दीत रहावं लागतं, यावेळी असे प्रकार बऱ्याचदा घडतात, ते होऊ नये याची काळजी प्रत्येकीलाच यापुढे घ्यावी लागणार आहे.

नशीब बलवत्तर की त्या दारूड्यानं प्रज्ञाताईंना हातानं फटका मारला, काही हत्यार वगैरे असतं तर काहीही होऊ शकलं असतं, जसं मागच्या वर्षी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या रोहीणी खेवलेकर यांच्या गाडीवर रॉडनं हल्ला करण्यात आला, त्यात त्या बालंबाल बचावल्या.

Sudhir Mungantiwar : हेमंत रासने सत्तेसाठी नाही तर ‘सत्या’साठी लढणार!

हे त्यांचं नशीब त्या प्रकरणात पुढं काय झालं? मला माहीत नाही असो, प्रज्ञाताईंवर ज्या हरामखोर दारूड्यानं हल्ला केलाय, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुढची कारवाई होईलच पण यातनं आपण सगळ्याच मैत्रिणींनी गर्दीत असतांना काळजी घेण्याची गरज आहे असं वाटतंय, असंही यावेळी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

Tags

follow us