live now
Nagarparishad Election Result Live : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला परळीत मोठा धक्का
Nagarparishad Election Result : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून
Nagarparishad Election Result : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 288 पैकी 264 नगरपरिषदेसाठी आणि नगरपंचायतीसाठी राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती तर 20 डिसेंबर रोजी 24 नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यंदा मुख्य लढत महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. काही ठिकाणी भाजपविरुद्ध शिंदे शिवसेना तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता.
LIVE NEWS & UPDATES
-
ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री भिसे विजयी
पंढरपूर कुर्डूवाडी नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री भिसे 600 मतांनी विजयी झाल्या आहेत. इथे भाजपचा पराभव झाला असून शरद पवार पक्षाचे 13 उमेदवार विजयी, शिवसेनेचा एक आणि अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
-
एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिलं यश
एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिलं यश
-
जेजुरीत जयदीप बारभाई विजयी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी
भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी
तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी.
-
खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी
खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारत या ठिकाणी अमीर पटेल हे नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले आहेत त्यांनी भाजपचा उमेदवाराचा पराभव केला आहे.
-
महाडमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का
महाडच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुनील कविस्कर विजयी. भरत गोगावले यांचा तटकरेंना धक्का, महाड नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा
-
भाजपचं शतक पूर्ण...तर शिंदे अन् अजित पवार गटाची अर्धशतकाकडे वाटचाल
भाजपची 101 जागांवर आघाडी
-शिंदेंची शिवसेना 42 जागांवर
-अजितदादांची राष्ट्रवादी 35 जागांवर
-काँग्रेस 16 जागांवर तर शरद पवार गट 10 आणि ठाकरेसेना 7 जागांवर आघाडीवर
-
औसा नगरपरिषदेचं चित्र स्पष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी
- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा
- 23 जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय
- 6 जागेवर भाजप विजय
- काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, गेल्या वेळेस दोन वरून, यंदा शून्यावर काँग्रेस
- नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजय
-
अहिल्यानगर जामखेडमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ
अहिल्यानगर जामखेडमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ
जामखेडमध्ये मतमोजणी थांबली
2 उमेदवारांनी evm वर आक्षेप घेतला
निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार याकडे लक्ष
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला
-
भगूरमध्ये शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरूंग; भाजप-राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणूकीचा निकाल हाती येत आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याच 11 नगरपरिषदांसाठी निवडणूक पार पडल्यानंतर आज भगूरमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे विजयी झाल्या आहेत. या विजयामुळे भगूरमध्ये गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या सत्तेला सुरूंग लागला आहे.
-
मालवणमध्ये निलेश राणेंचीच हवा...नगरसेवकांची विजयाकडे वाटचाल...
Malwan Nagarparishad : राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचे (Malwan Nagarparishad Election Result ) निकाल हाती येत आहेत. अशातच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेची निवडणुकी राज्याच चर्चेचा विषय बनली होती. याच निवडणुकीत दोन भावांचा उघडउघड संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपचे मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यात संघर्ष झाल्याचं दिसून आलं होतं. या निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटप केल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला होता. याचदरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावरही त्यांनी थेट आरोप केले होते. अखेर या निवडणुकीत शिंदे गटाच्या नगरसेवकांची विजयाकडे वाटचाल सुरु असल्याचं चित्र दिसून येत असल्याने मालवणमध्ये निलेश राणे यांचीच हवा असल्याचं सिद्ध होताना दिसत आहे.
