VIDEO: सोनम वागंचुक नेमकी भेटले कसे ? अभिजित दिपकेंनी सांगितली इंटरेस्टिंग स्टोरी

Abijeet Dipke: मी त्यांच्या इन्टाग्रामवर कमेंट केले., सर मला बोलायला आवडेल, तुम्हाला डेटा शेअर करेल. त्यांनी फोन नंबर इन्टाग्रामवर पाठविला.

Abhijeet Dipke

Abhijeet Dipke

CJP Abijeet Dipke and Sonam Wangchuk : नीट परीक्षा पेपर लीकवरून जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनासमोर सरकारला झुकावे लागले होते. या आंदोलनातून दोन चेहरे चर्चेत आले. एक म्हणजे सामाजिक कार्यकर्ते सोनम वागंचुक (Sonam Wangchuk ) आणि दुसरे सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके (CJP Abijeet Dipke) . परंतु हे दोघांची भेट कशी झाली, याची इंटरेस्टिंग स्टोरी अभिजित दिपके यांनी लेट्सअपच्या मुलाखतीत सांगितली.

संसदेत कंगना राणौतचा साधा साडी लूक; पण चर्चेत राहिल्या 56 लाखांच्या लक्झरी अ‍ॅक्सेसरीज!

मी अमेरिकेत होतो. तेव्हा सोनम वांगचुक यांनी कॉकरोच जनता पार्टीचे पोस्टर री शेअर केले होते. त्यावर कमेंट करत चांगली चळवळ आहे, असे सांगितले होते. त्यानंतर लद्दाख उपराज्यपाल यांनी वागचुंक यांना बोलवून घेतले होते. तिथे सांगितले सीजेपीपासून दूर राहा. बाहेरून फंडिंग भेटते, या लोकांचे फॉलोअर्स पाकिस्तानचे आहेत, असे राज्यपालांनी वांगचुक यांना सांगितले. राज्यपालांनी बैठकीला ट्वीस्ट केले. त्यांनी बाहेर येऊन येऊन सांगितले की वागंचुक हे सीजेपीला समर्थन देत नाही. ते बाहेरून फंडिंग घेत आहेत. त्यानंतर वांगचुक यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी असे काहीही बोललो नाही. मी फक्त भेटायला गेलो होतो. मला माहिती नाही. या प्रकारचे काही बोललो नाही, असे वांगचूक यांनी सांगितले.


आता ‘ॲडव्हान्स टिप’ चा खेळ संपला; Ola, Uber आणि Rapido राइड बुकसाठी नवीन नियम जाणून घ्या

अभिजित आणि कॉकरोच जनता पार्टीमध्ये जे कोणी लोक आहेत, त्यांनी हे सिद्ध करायला हवे की ते बाहेरून फंडिंग घेत नाही. फॉलोअर्स पाकिस्तानमधून नाहीत. त्यांनी सिध्द केले तर मला त्यांच्याशी बोलायला आवडेल, असे वांगचुक म्हणाले होते. मी त्यांच्या इन्टाग्रामवर कमेंट केले., सर मला बोलायला आवडेल, तुम्हाला डेटा शेअर करेल. त्यांनी फोन नंबर इन्टाग्रामवर पाठविला. त्यानंतर मी सरांना फॉलोअर्स भारतीय आहेत. 94.7 टक्के फॉलोअर्स भारतीय आहेत. जे काही बाहेरचे आहेत, त्याच अमेरिका, लंडन, दुबई, कॅनडामधील आहेत. ते म्हणाले माहिती आहे, असे वागंचुक म्हणाले. माझ्या मनात डाउट नव्हता, असे वांगचुक यांनी स्पष्ट केले. त्यानंतर एका अनुभवी माणसाच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत असल्याने त्याचा मला खूप मोठा आनंद झाला होता, असे दीपके यांनी सांगितले.

Exit mobile version