CJP Abijeet Dipke : जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आलेले कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके (Abijeet Dipke ) यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत दीपके यांना सरकारवर एक खळबळजनक आरोप केला. सोनम वागंचुक यांना उचलून नेण्यात आल्यानंतर मला एकटे पाडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. सरकारशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या दोन सहकाऱ्यांची फोन हिसकावून घेऊन त्यांना पाच तास बसून ठेवले होते, असा आरोप दिपके यांनी केलाय.
दिपके म्हणाले, नम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलनास्थळावरून उचलून नेले होते. त्यानंतर मी आंदोलनाचा नेतृत्व करण्याचे ठरविले. त्यानंतर मी उपोषणला बसलो होतो. परंतु मला उपोषण झेपले नाही. मला खूप थकवा आला होता. तरीही मी आंदोलन करण्याचे ठरविले होते. आम्ही आंदोलनातून उठणार नाही, अशी भूमिका माझी होती. 20 जुलै रोजी मंत्री जेपी नड्डा यांनी प्रतिनिधींना भेटायला बोलविले होते. आमच्याकडून सौरव दास आणि आशुतोष रांका हे भेटायला गेले. त्याचवेळी सरकारने आंदोलन मोडित काढण्याचे ठरविले होते. मला एकटे पाडायचा प्रयत्न केला होता. सौरव व आशुतोषला बैठकीला सरकारने बोलविले आहे आणि पाच तास बसून ठेवले होतो. बारा एक वाजता बोलविले आहे. मी दोघांना फोन करत होता. पण फोन लागत नव्हता.
माझ्या अंगात ताकद नव्हती. मी बोलू शकत नाही. मी एकटा असल्याचे बघून सरकारने दोघांना साइडला करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे क्राउड कंट्रोल होणार नव्हती.सौरव व आशुतोषला जेपी नड्डा हे दहा मिनिटे भेटले. जेपी नड्डांना भेटताना दोघांचे फोन जप्त करण्यात आले होते. एकप्रकारे हाऊस अरेस्ट झाले होते. फोन लागत नव्हता. शेवटी फोन कनेक्ट झाला. त्यानंतर दोघांनी सांगितले, फोन हिसकावून घेतले होते आणि आम्ही बसून ठेवले होते, असे आरोप दिपके यांनी सरकारवर केलाय. दुसऱ्या वेळेस मात्र दोघांनाही सरकारच्या दबावात यायचे नाही. थेट बोलायचे आणि निघून यायच्या असे सांगितले.
